बिलोली शहर विकास कृती समितीच्या उपोषणाचा दणका

0
6
 बिलोली  ( सय्यद रियाज)  प्रधानमंञी पिक विमा योजनेच्या आँनलाईन सर्वर मधून बिलोली शहराचे नाव वगळण्यात आल्यामुळे बिलोली शहर विकास कृती समितीच्या वतीने  दि.२७ जुलै रोज शुक्रवारी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.या आंदोलनानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासन व संबंधित विमा कंपनीने शुक्रवारी राञी आँनलाईनमध्ये शहराचे नाव समाविष्ट केल्यामुळे पिक विमा भरण्यास प्रारंभ झाला आहे.
   तालुक्यातल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या कष्टाने का होईना पिक विमा भरण्याची सोय करण्यात आली होती.माञ पिक विमा भरण्याच्या आँनलाईन पोर्टलवर बिलोली शहराच्या नावाचा उल्लेख नव्हता.त्यामुळे  शहरातील शेतकऱ्यांना पीक विमा भरता येत नव्हते.याबाबत बिलोली शहर विकास कृती समितीच्या वतीने  जिल्हाधिकारी ,जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना व आमदारांना प्रत्यक्ष भेटून शेतकऱ्यांच्या अडचणी सांगून सतत पाठपुरावा करून २७ जुलै रोजी एक दिवशीय लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता. उपोषणाचा इशारा देऊनही काहीच होत नसल्यामुळे शहरातील शेतकऱ्यांच्या संतृप्त भावना लक्षात घेऊन बिलोली शहर विकास कृती समितीचे गोविंद मुंडकर ,सुभाष पवार,विजय कुंचणवार,भिमराव जेठे, ,प्रकाश पोवाडे यांच्या सह तब्बल ७५ शेतकऱ्यांनी दि.२७ जुलै रोजी येथील तहसिल कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले.याऊपरही विमा भरण्याची व्यवस्था न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला होता.कृती समितीच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर करण्यात आलेल्या उपोषणाची अधिकारी व लोकप्रतीनिधींनी दखल घेऊन  दि.२७ जुलै रोजी पंतप्रधान पिक विमा भरण्याच्या आँनलाईन पोर्टलमध्ये बिलोली शहराचे नाव समाविष्ट करण्यात आले असून शहरातील शेतकऱ्यांना पिक विमा भरण्याची सोय झाली आहे.शेतकऱ्यांच्या प्रमुख अशा मागणीची देखल बिलोली शहर विकास कृती समितीने पिक विम्याची अडचण दुर केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.