रवि राणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

0
5

अमरावती,दि.30 : सिटी बँक घोटाळा प्रकरणाच्या अनुषंगाने खा. आनंदराव अडसूळ यांची जाहीररीत्या बदनामी केल्याच्या कारणावरून गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी आ. रवि राणा यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविला. खा. अडसूळ यांनी गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून स्वत: तक्रार नोंदविली.
आपल्याविरुद्ध सीबीआय, ईडी किंवा राष्ट्रपती वा लोकसभा अध्यक्षांकडून कसल्याही प्रकारची चौकशी सुरू नाही. असे असताना आ. रवि राणा यांनी सार्वजनिक माध्यमांवर खोटी माहिती प्रसिद्ध करून आपली व खाजगी सचिवांची बदनामी केल्याची तक्रार खा. आनंदराव अडसूळ यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत पोलीस आयुक्तांकडे केली होती. शिवसेनेचे शहरप्रमुख प्रवीण हरमकर व गटनेता प्रशांत वानखडे यांनी पोलीस आयुक्तांंना भेटून ही तक्रार नोंदविली होती. पश्चात सोशल मीडियावर बदनामीकारक खोटे संदेश पाठवून समाजात आपली प्रतिमा मलीन करणाºया आ. राणा व त्यांना गुन्ह्यात मदत करणाºयांविरुद्ध गुन्हा नोंदवावा, अशी तक्रार शनिवारी खा. अडसुळांनी गाडगेनगर पोलिसांकडे केली. त्यानुसार पोलिसांनी आ. रवि राणा यांच्यासह इतरांविरुद्ध भादंविच्या कलम ५००, ५०१, ३४, अ‍ॅट्रासिटीच्या कलम ३, १, पीक्युयूप्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे.
रवी राणा म्हणतात, ही..दुर्भाग्याची गोष्ट
खा. आनंदराव अडसूळ अध्यक्ष असणाऱ्या सिटी बँकेच्या नऊ शाखा बंद पडल्या. त्या बँकेचे हजारो गोरगरीब खातेदार हादरले आहेत. त्यामुळे चार खातेदारांचे मृत्यू झालेत. रिझर्व्ह बँकेने सिटी बँकेवर निर्बंध आणलेत. लोकप्रतिनिधी या नात्याने राष्ट्रपतींकडे तक्रार केली. मात्र, खासदाराचा भ्रष्टाचार उघड करणाऱ्या आमदारावरच गुन्हे दाखल होत असेल, तर ते योग्य नाही. गरिबांच्या न्यायासाठी लढतच राहील. खा.अडसूळ व त्यांचे पीए सुनील भालेराव यांच्या संपत्ती तपासणीची मागणी राष्ट्रपतींकडे लावून धरू. त्यांच्यावर मनी लाँड्रींग कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची मागणी भविष्यात करू. खा. अडसुळांनी जातीचा दुरुपयोग केल्याने कायद्याची बदनामी होत आहे.