मुकुंदवाडीत कडकडीत बंद

0
9

औरंगाबाद,दि.30 – रविवारी रात्री मुकुंदवाडीतील तरुण प्रमोद पाटील होरे यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्यानंतर सोमवारी सकाळी औरंगाबादेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी व आत्महत्येमुळे प्रक्षुब्द्ध जमाव रस्त्यावर उतरला होता. जालना रोडवरील विविध दुकाने व कार्यालये बंद करण्यात आली होती. मुकुंदवाडी चौकापासून ते सिडको चौकापर्यंत जालना रोड ठप्प होता. त्या ठिकाणी जवळपास 1 ते दीड हजारांचा जमाव उतरला होता.

जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस व्हॅन व दंगा नियंत्रण पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. मराठा आरक्षणासाठी प्रमोद पाटील यांच्या आत्महत्येमुळे मुकुंदवाडी गावात पूर्णपणे कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: 12.30 वाजेच्या सुमारास आंदोलन स्थळी भेट देऊन मोघम निवेदन दिले. ते आंदोलकांनी न स्वीकारल्याने त्यांनी मृत पाटील यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत व त्यांच्या कुटुंबीतील एकाला शैक्षणिक योग्यतेनुसार नोकरीचे लेखी निवेदन दिले. निवेदनवजा पत्रानुसार, आंदोलनकर्त्यांच्या सर्व प्रमुख मागण्यांचा पाठपुरावा करून मृत प्रमोद पाटील यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे