पंचायती राज समिती भंडारा जिल्हयाच्या दौऱ्यावर

0
19

भंडारा, दि. 31 :- महाराष्ट्र विधानमंडळाच्या पंचायती राज समिती 1 ते 3 ऑगस्ट 2018 पर्यंत जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात पंचायती राज समितीचे प्रमुख आमदार सुधीर पारवे यांचे सह विधानसभा सदस्य  बाबुराव पाचर्णे, चरण वाघमारे, रणधीर सावरकर, ॲड. राहुल कुल, आर.टी. देशमुख, डॉ. देवराव होळी, डॉ. सुरेश खाडे, डॉ. सुधाकर भालेराव, सुधाकर कोहळे, भरतसेठ गोगावले, किशोर पाटील, राजेश क्षीरसागर, तुकाराम काते, राहुल बोंद्रे, भारत भालके, प्रा. विरेंद्र जगताप, दिलीप सोपल, राहुल मोटे, दीपक चव्हाण, प्रविण दरेकर, प्रा. डॉ. तानाजी सावंत, विक्रम काळे, सतीश चव्हाण, अमरनाथ काळे, विशेष आमंत्रित विधान परिषद सदस्य बाळाराम पाटील, श्रीकांत देशपांडे व दत्तात्रय सावंत असे एकूण 28 समिती सदस्यांचा समावेश आहे. तसेच सचिवालायाचे उपसचिव, अवर सचिव, दोन कक्ष अधिकारी, कर्मचारी असे एकूण 14 व्यक्ती त्यांचे सहकार्याकरीता राहणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम या प्रमाणे आहे.
1 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 10 ते 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह भंडारा येथे जिल्हयातील विधानमंडळाच्या सदस्यांशी अनौपचारिक चर्चा. सकाळी 10.30 ते 11 वाजता शासकीय विश्रामगृह येथे भंडारा जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी अनौपचारिक चर्चा. सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद भंडारा येथे सन 2012-13 च्या लेखा पुनर्विलोकन अहवालातील भंडारा जिल्हा परिषदेच्या संबंधातील परिच्छेदासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांची साक्ष तसेच 2 ऑगस्ट 2018 रोजी भेट देण्यात यावयाच्या पंचायत समित्या ठरविणे.2 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 9 वाजता पासून जिल्हयातील पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायतींना भेटी त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात आढावा बैठक घेतली जाणार आहे.