वाहन परवाना कँम्प  ठेवण्याची-बिलोली शहर विकास कृती समितीची मागणी

0
13
बिलोली(सय्यद रियाज ),दि.31ः- तालुक्यातील आणि शहरातील वाहनधारकांना परवान्यासाठी नांदेडला जावे लागते.त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी बिलोली किंवा कार्ला फाटा येथे एक दिवसीय शिबीर घेऊन परवाना देण्यात यावा अशी मागणी बिलोली शहर विकास कृती समितीने केली आहे.
बिलोली शहर विकास कृती समितीच्या माध्यमातून यापूर्वी पीक विम्याचा प्रश्न हाती घेण्यात आला होता. त्या पाठोपाठ बिलोली शहर आणि तालुक्यातील वाहनधारकांना परवाना मिळण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून कार्ला फाटा येथील आरटीओ कार्यालयात परवाना देण्यासाठी किमान एक दिवसाचे शिबीर तरी आयोजित करण्यात यावे. या मागणीचे निवेदन बिलोली शहर विकास कृती समितीने यापूर्वी दिले होते. दरम्यान बिलोली शहर विकास कती समितीचे कार्याध्यक्ष सुभाष पवार यांनी वाहनधारकांच्या गैरसोय टाळण्यासाठी तातडीने मुंबईला जाऊन आमदार सुभाष साबणे यांच्या माध्यमातून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेतली .आणि तातडीने बिलोलीत किंवा कार्ला येथील आरटीओ कार्यालयात परवाना देण्यासाठी एक दिवशी शिबिर सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले.या निवेदनावर सुभाष पवार ,गोविंद मुंडकर ,भीमराव जेठे ,विजयकुमार कुंचनवार ,उमेश बिलोलीकर ,प्रकाश  पोवाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.