पोवार समाजाला ओबीसीत आणण्यासाठी लढणारे कर्मयोगी हरपले

0
25

गोंदिया ,दि.01ः- महाराष्ट्र,मध्यप्रदेशात बहुसंख्येने वास्तव्यास असलेल्या आणि ग्रामीण भागातील शेतीशी जुळलेल्या पोवार (पवार) समाजाला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात बळकट करून त्यांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४० मध्ये दिलेले संविधानिक अधिकाराची निंतात असलेली गरज लक्षात घेत मंडल आयोगाची सुनावणी नागपूरात जेव्हा झाली तेव्हा समाजाची परिस्थिती आणि आकडेवारीसह सविस्तर निवेदन सादर करुन समाजाला ओबीसीत समाविष्ठ करुन घेण्यासाठी अ‍ॅड. पी.सी.बोपचे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पहिले निवेदन सादर केले होते.
त्यातच या निवेदनानंतर तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची भेट घेऊन त्यांना समाजाची माहिती दिल्याशिवाय काही होणार नाही हे लक्षात आल्यावर तत्कालीन भंडारा लोकसभा मतदार संघाचे खासदार केशोराव पारधी यांच्याकडे पी.सी. बोपचे यांनी आग्रह धरला. आज या दोन्ही कर्मयोगी व्यक्तिंनी समाजसेवा करत जगाचा निरोप घेतला आहे. पवार समाजाला मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासाठी झटणारे दोन्ही कर्मयोगींचे निधन एकाच जुलै महिन्यात होणे हा ही एक योगायोगच म्हणावा लागेल. अशा समाज सेवी कर्मयोगी व्यक्तींच्या जीवन कार्यावर प्रकाश घालण्यासाठी बेरार टाईम्सने घेतलेला त्यांच्या हा कार्याचा आढावा.
१९८४ च्या काळात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले अ‍ॅड.पी.सी.बोपचे यांनी आपल्या सहकारी समाजबांधवांना सोबत घेऊन पोवार (पवार) समाजाला ओबीसीच्या मुख्यधारेत आणण्यासाठी तसेच मंडल आयोगाच्या शिफारशींचा लाभ मिळावा यासाठी पुढाकार घेतला.आणि तत्कालीन प्रधानमंत्री स्व.इंदिरा गांधी यांची भेट घेण्यासाठी तत्कालीन खासदार स्व. केशोराव पारधी यांची दिल्लीत समाजाच्या ११ सदस्यीय शिष्टमंडळाने भेट घेतली.
पारधी यांना समाजाची माहिती आणि परिस्थितीचे अवलोकन करुन दिले. त्यानंतर लगेच तत्कालीन खासदार पारधी यांनी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना समाजाच्या प्रतिनिधीमंडळासोबत भेट करवून देण्यासाठी पुढाकार घेतला होता. पारधी यांच्या आग्रहावर श्रीमती गांधीनींही शिष्टमंडळाला वेळ दिली. आणि ओबीसी प्रवर्गात पोवार, पवार समाजाला समाविष्ठ करण्याचे निवेदन स्विकारत चर्चा केली होती. त्या शिष्टमंडळात अ‍ॅड.पी.सी. बोपचे, डॉ. खुशाल बोपचे, अ‍ॅड. पी.के. रहागंडाले, एच.एस. रहागंडाले, स्व. डॉ. हिरामण रहागंडाले, आनंदरावजी बोपचे व चुन्नीलाल ठाकुर या मंडळींचा समावेश होता. समाजातील ही मंडळी त्या काळात मंडल आयोगासाठी काम करीत होती.
आज त्यांनी १९८४ च्या काळात जे काम केले त्या कामाचा वारसा समाजामध्ये चालविण्याची खरी गरज असून त्यांनी समाजासाठी केलेल्या या मोठ्या कार्याची दखल सुद्धा घेणे तेवढेच क्रमप्राप्त मला वाटत आहे.त्यांनी त्याकाळी मंडल आयोगाच्या शिफारशी समाजाला मिळाव्यात यासाठी केलेल्या लढ्याचे यश की आज ओबीसीच्या आंदोलनात पोवार(पवार)समाजातील व्यक्तींचा असलेला सहभाग हा त्यांनी केलेल्या दिशात्मक कार्याचा आलेखच म्हणावा लागेल यात शंकाच नाही. समाजासाठी लढणारे अशा कर्मयोगी समाजसेवी अ‍ॅड.पी.सी.बोपचे यांना १८ जुर्ले २०१८ रोजी भंडारा निवासी तर २९ जुलै रोजी माजी खासदार केशोराव पारधी यांना तुमसर निवासी मोक्षप्राप्ती झाली.
तत्कालीन सीपीएण्ड बेरार राज्य (आजच्या मध्यप्रदेशातील) बालाघाट जिल्ह्यातील वारासिवनी तालुक्यातील घोटी येथे १ जुर्ले १९३० रोजी जन्मलेले पी.सी.बोपचे यांचे सुरवातीचे इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतंचे शिक्षण मध्यप्रदेशातील लालबर्रा येथे झाले.त्यानंतर गोंदियात १० वी पर्यंतचे शिक्षण झाले.त्यांनी कायद्यात पदवी,कला शाखेत(हिंदी माध्यम) पदव्युत्तर शिक्षण,राज्यशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण,qहदी साहित्य रत्न मध्ये मास्टर ऑफ डिग्री अशा अनेक पदव्या घेतल्यानंतर आपल्या शिक्षणाचा लाभ सामान्यांना व्हावा यासाठी शिक्षकाची नोकरी स्वीकारून समाजकार्यात स्वतःला नेहमीच अग्रेसर ठेवणारे अ‍ॅड पी.सी.बोपचे यांचे नुकतेच निधन झाले.त्यांच्या निधनानंतर मात्र त्यांच्या खèया समाजकार्याची ओळख पोवार समाजातील नवपिढीला होणे ही तेवढेच गरजेचे आहे.आज महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील देशाच्या कानाकोपèयात वसलेला पोवार, पवार समाजाला मंडल आयोगाच्या शिफारशी लागू व्हाव्यात आणि पोवार, पवार समाजाला ओबीसी (इतर मागासवर्ग ) यादीत स्थान मिळावे यासाठी तत्कालीन प्रधानमंत्री स्व.इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात तत्कालीन खासदार केशवरावजी पारधी यांना सोबत घेऊन समाजात १९८४ च्या काळात केलेली जनजागृती उल्लेखनीय राहिली.
इंदिरा गांधी यांच्याशी तत्कालीन खासदार पारधी यांचे असलेल्या घनिष्ठ संबंधामुळेच त्यांच्या एका भ्रमणध्वनीवर श्रीमती गांधींनी भेटण्याची वेळ दिली. ही पारधी यांच्या समाजसेवी आणि संसदीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे वजनच म्हणावे लागेल. पोवार,पवार समाजाला ओबीसीच्या यादीत स्थान मिळवून सविंधानिक अधिकार प्राप्त व्हावे यासाठी बोपचे यांनी केलेल्या कार्याची ज्योत तेवत ठेवणेही तेवढेच गरजेचे आहे.त्यापूर्वी बोपचे यांनी १९७९-८० च्या काळात पोवार समाज महासंघ भंडाराची स्थापना करण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. त्यावेळी भंडारा जिल्हा मुख्यालयात फक्त ७ ते ८ घरात पोवार समाज होता.सेवेने शिक्षक राहिल्यामुळे त्यांचे नाव भंडारा-गोंदिया जिल्ह्यात नेहमीच राहिले.चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील जनता विद्यालयातून त्यांनी नोकरीला सुरवात केली.त्यानंतर १९६७ ला भंडारा येथे निरीक्षक म्हणून आले.त्यातच बेला येथील डीएड अध्यापक विद्यालयात व्याख्याता म्हणून कार्य केले.त्यांनी उपशिक्षणाधिकारी म्हणूनही नोकरीत कर्तव्य बजावले.
आपल्या शासकीय सेवेच्या कार्यकाळात सर्वांना समान संधी न्याय व सामाजिक भान ठेवत कार्य केल्यानंतर जुर्ले १९८९ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.त्यांनी आपल्या वयाच्या ३५ व्या वर्षापासून ६० व्या वर्षापर्यंत वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय qहदी विद्यापीठाच्या माध्यमातून हिंदी राष्ट्रभाषेच्या प्रचार प्रसारासाठी सातत्याने कार्य केले.त्यांच्या कार्याचा गौरव केंद्रसरकारनेही राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देऊन केले होते.विशेष म्हणजे बोपचे यांनी कविता लेखन सुद्धा केले असून संगीताच्या क्षेत्रात त्यांची रुची होती.नाटकातील कलावंत म्हणूनही त्यांनी काम करताना पुरोगामी विचारांना मात्र नेहमीच प्राधान्य देत मुला-मुलींमध्ये कधीच भेदभाव केला नाही.
अ‍ॅड.पी.सी.बोपचे यांचे १८ जुर्लेला निधन झाले.त्यांच्यावर १९ जुर्लेला भंडारा येथील वैनगंगा नदीघाटावरील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यावेळी आयोजित शोकसभेच्या अध्यक्षस्थानी संत बांगळूबाबा शैक्षणिक सुधारणा मंडळ मालुटोलाचे संस्थापक जगदीश येळे होते. या शोकसभेला माजी उपशिक्षणाधिकारी फसाटे, जगदीश लोहिया, राधेलाल पटले, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, अनिलकुमार चौधरी, नरेश बोपचे, एड.हरी पांडे यांच्यासह मोठ्या संख्येने त्यांचा चाहता वर्ग उपस्थित होता. बोपचे यांच्या निधनाबद्दल भोयर पवार महासंघ राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेच्यावतीने नागपुरातील कुकडे ले आउट येथे आयोजित एका कार्यक्रमांत श्रद्धांजलीही वाहण्यात आली.