सामाजिक न्यायमंत्री बडोलेंनी घेतली श्रामणेर दीक्षा

0
12

गोंदिया,दि..01- राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारला(दि.३०)थायलंड येथे श्रामणेर दीक्षा घेतली.
कोलकत्ता येथे पुरस्कार स्विकारल्यानंतर ते शनिवारला कोलकत्यावरूनच थायलंडला रवाना झाले होते.ना.बडोले यांच्या निकटवर्तीयांनाही याबाबत अधिक माहिती नसली तरी सोशल मिडीयावर त्यांनी बौध्द श्रामणेर दीक्षा घेतल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे.विधानसभेच्या निवडणुकांना वर्षभराचा कालावधी शिल्लक असतांना त्यांनी श्रामणेर दीक्षा घेतल्याने राजकीय वर्तुळाच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.भाजपमध्ये सुध्दा बडोलेंनी अचानकपणे घेतलेल्या निर्णयांबद्दल कुणालाच कल्पना नाही.
या दीक्षेमुळे ते आता राजकारणात सक्रीय राहणार की नाही याबाबत शंका कुशंकना पेव फुटले आहे.तर काहींच्या मते डव्वा येथील धम्मकुटी परिसरात कामठी येथील डॅग्रन पॅलेस सारखा बौध्द स्तुप तयार करण्याकरीता त्यांनी दीक्षा घेतली आहे.
श्रामणेर दीक्षा घेतल्यानंतर बौध्द धर्मात श्रामणेरला भंते म्हटले जाते.मात्र ते भंदत qकवा भिक्खू नसतात.काही दिवस ते भिक्खूप्रमाणे आयुष्य जगतात.यासाठी त्यांना भिक्खूकडून दीक्षा घ्यावी लागते.त्यानंतर मुंडण करुन तसेच अंगावर काशाय वस्त्र धारण करुन संघात प्रवेश करावा लागतो.श्रामणेर झालेल्या व्यक्तीला आयुष्यभर् बौध्द धर्मातील १० शीलांचे पालन करण्याचे व्रत घ्यावे लागते.यानंतर ज्या व्यक्तीला भिक्खू बनण्याची इच्छा असेल त्याची संघामार्फेत परीक्षा घेतली जाते व उपसपंदा दीक्षा संस्कार झाल्यानंतरच त्यांना भिक्खू म्हटले जाते.२० वर्षापेक्षा कमी वयाच्या श्रामणेरची उपसंपादा केली जात नाही.