जिल्हाधिकारी यांच्या हस्ते बालमजूर विद्यार्थ्यांना बँक पासबुक वितरण

0
42

गोंदिया,दि.१ : राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समिती, जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया अंतर्गत जिल्ह्यात बालमजूर विद्यार्थ्यांकरीता सुरु असलेल्या विशेष प्रशिक्षण केंद्र अदासी येथील बालमजूर विद्यार्थ्यांना श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली यांच्याअंतर्गत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीकरीता बँक पासबुकचे वितरण जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून विशेष प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी-सवलती तसेच त्यांना मिळत असलेल्या शिक्षणाबाबतची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांकडून जाणून घेतली. यावेळी शिक्षणाधिकारी(प्राथमिक) उल्हास नरड, सहायक कामगार आयुक्त तथा राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समितीचे सदस्य सचिव राजु गुल्हाने, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक मदन खडसे, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समितीचे प्रकल्प संचालक महेंद्र रंगारी, कार्यक्रम व्यवस्थापक नितीन डबरे, शिक्षण निर्देशिका सीमा राऊत, शहाजाद खान व अदासी येथील विशेष प्रशिक्षण केद्रात शिक्षण घेणारे ११ बालमजूर विद्यार्थी उपस्थित होते.