४ ऑगस्टला गोंदिया येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना मेळावा

0
11

गोंदिया,दि.१ : महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा योजना समन्वय समिती आणि नियोजन विभाग यांच्या संयुक्त वतीने गोंदिया तालुक्यातील माविमच्या बचतगटातील महिलांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन ४ ऑगस्ट रोजी गोंदिया येथील जलाराम लॉन येथे दुपारी १२ वाजता करण्यात आले आहे.
मेळाव्याचे उदघाटन आमदार गोपालदास अग्रवाल हे करतील. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी हया असतील. विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प.कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवाने, महिला व बालकल्याण समिती सभापती लता दोनोडे, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमनलाल बिसेन, जि.प.सदस्य श्यामकला पाचे, भोजराज चुलपार, छाया दसरे, विमल नागपुरे, रजनी गौतम, कुंदनलाल कटारे, विजय लोणारे, खुशबू टेंभरे, विठोबा लिल्हारे, कमलेश्वरी लिल्हारे, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत, अग्रणी जिल्हा प्रबंधक दिलीप सिल्लारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रभारी व्यवस्थापक बी.एम.शिवणकर, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके,तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून तहसिलदार टी.आर.भंडारी, गटविकास अधिकारी सचिन पानझडे, न.प.मुख्याधिकारी चंदन पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
या मेळाव्यात उत्कर्ष लोकसंचालीत साधन केंद्र गोंदियाची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. तरी गोंदिया तालुक्यातील बचतगटांच्या महिलांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी केले आहे