मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या भाजप आमदारांची बैठक

0
9

मुंबई,दि.01(वृत्तंसस्था) :- आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाजाचेआंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने गुरुवारी आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत मराठा आरक्षणामुळे आंदोलनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. ही बैठक गुरुवारी दुपारी दोन वाजता होणार असून, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत आरक्षण आंदोलनामुळे राज्यात निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापून आंदोलनाला राज्यभरात हिंसक वळण लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपल्या आमदारांची बैठक बोलावून मराठा आरक्षणाबाबत आपापली भूमिका निश्चित केली. मात्र भारतीय जनता पक्षाकडून मराठा आरक्षणाबाबत आपल्या आमदारांचे म्हणणे जाणून घेण्यात आलेले नाही. त्यातच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार आरक्षण जाहीर करण्यास मुद्दाम चालढकल करत असल्याचा समज मराठा समाजात निर्णाण झाला असून, त्यामुळे भाजपविरोधात संताप वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने तिला महत्त्व आले आहे.