बस सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांचा ‘एल्गार’

0
12

मूल,दि.02ः- येथे शालेय विद्यार्थ्यांनी ‘बस द्या बस द्या’ अश्या गगनभेदी घोषणा देत बसस्थानक परिसरात वेळेवर बस सुरू करण्यासाठी १ ऑगस्ट रोजी आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व र्शमिक एल्गारच्या अध्यक्ष अँड.पारोमिता गोस्वामी यांनी केले.
ग्रामीण भागातून विद्यार्थी मुलला शिक्षणाकरीता येत असल्याने महामंडळाच्या अनियमित वेळेमुळे विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात पोहोचायला वेळ लागत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सोबतच घरी परतण्याकरिता सुध्दा उशिर लागत असल्याने सुरशिततेचा प्रश्न उपस्थित होत असल्याचा आरोप गोस्वामी यांनी केला.
नागपूर-गडचिरोली-चंद्रपूर-पोंभुर्णा-गोंडपिपरी मार्गावरच्या एसटी बस सकाळी ७.३0 पयर्ंत मुलला पोहोचतील तसेच दररोज दुपारी १२ वाजता, सायंकाळी ५ वाजता, बुधवारी दुपारी ३ वाजता मुलवरुन नियमित सोडण्याची मागणी र्शमिक एल्गारच्या अध्यक्ष पारोमिता गोस्वामी, विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी केला आहे. शालेय वेळेत बस सुरू करावी, गाव तेथे बस सुरू करावी, यासाठी र्शमिक एल्गारने मूल बसस्थानक परिसरात केलेल्या आंदोलनाला शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फू र्त प्रतिसाद दिला. या आंदोलनाची दखल घेत परिवहन मंडळाच्या अधिकार्‍यांनी बैठकीत सर्व मार्गावर बसेस चालु करण्याचे जाहीर केले. रुग्णांना उपचाराकरिता बससेवेअभावी वेळेवर रुग्णालयात नेता येत नाही. शाळकरी विद्यार्थ्यांना बस अभावी शिक्षणसोडून घरी बसण्याची वेळ आलेली असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून नागरिकांना आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी बस स्थानक मुल येथे धरणे आंदोलन करून मागण्याचे निवेदन चंद्रपूरचे आगार व्ययस्थापक एस.व्ही.डफळे, वाहतूक अधीक्षक ए.बी.बोबडे, वाहतुक निरीक्षक एच.बी.गोवर्धन, वाहतूक निरीक्षक एस.सी. मेघावत,मूलचे वाहतूक नियंत्रक एन.डी.पठाण यांना देण्यात आले. आंदोलनाला श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार,अमित राऊत,गौरव श्यामकुळे, अमर कड्याम, रवि शेरकी यांनी मार्गदर्शन केले. आंदोलन यशस्वीतेकरीता शहनाज बेग, विशान नर्मलवार,संगिता गेडाम, वंदना मांदाडे, राणी भोयर,मिना पुन्नावार, सचिन वाकडे, अभिलाश भिमनवार,प्रतिक सिद्धावार, जय तंगडपल्लीवार यांनी परिश्रम घेतले.