शिवसैनिकांनी केला तहसीलदारांना घेराव

0
12

गडचिरोली,दि.02 : शेतकऱ्यांची कर्जमाफी,जिल्ह्यातील ओबीसींचे कमी केलेले आरक्षण, बेरोजगारी, कृषिपंप कनेक्शनसह जिल्ह्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर शिवसेनेने बुधवारपासून जिल्हाभरात आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून बुधवारला शिवसेनेच्या वतीने गडचिरोली येथील नायब तहसीलदार ए.बी.गुंफावार यांना घेराव घालून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शिवसेनेचे अहेरी विभाग प्रमुख विजय शृंगारपवार, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख छाया कुंभारे, सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात शिवसैैनिकांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके, उपजिल्हाप्रमुख राजू कावळे, नंदू कुमरे, गडचिरोली शहर प्रमुख रामकिरीत यादव, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर बघमारे, विभाग प्रमुख गजानन नैताम, संदीप दुधबळे, माजी जि.प.सदस्य सुनंदा आतला, उपजिल्हा प्रमुख डॉ.अश्विनी यादव, सुशिला जयसिंगपुरे, शकून नंदनवार, सिमा पाराशर, स्नेहा दलाल, छाया भोयर, विद्या बोबाटे, संध्या बुटले, गीता सोनुले, त्र्यंबक खरकाटे, पंढरी गेडाम, सदाशिव बुरांडे, रामभाऊ नैताम, महेश दुधबळे आदींसह बहुसंख्य शिवसैनिक हजर होते. आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून शिवसेनेतर्फे ३ आॅगस्टला जिल्ह्यातील सहा उपविभागीय अधिकाऱ्याना घेराव घालण्यात येणार आहे.