आयएमएच्या वतीने स्तनपान सप्ताहाचे आयोजन

0
11
गोंदिया,दि.०२ः- इंडियन मेडीकल असोशिएशन गोंदियाच्या महिला शाखेच्यावतीने जागतिक स्तनपान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने स्थानिय नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात आज गुरुवारला (दि.२)आईचे दूध नवजात बाळासाठी किती महत्वाचे असते याविषयावर तसेच नवजात बाळाच्या देखरेख आणि पुरक आहारावर चर्चासत्राच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.या कार्यक्रमाला आयएमए अध्यक्षा डॉ.निर्मला जयपुरीया,आयएमएच्या महिला शाखेच्या अध्यक्ष डॉŸ.पद्मिनी तुरकर,डॉ.शिल्पा मेश्राम,डॉ.रितू जैन,डॉ.अमित जैन यांनी मार्गदर्शन केले.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.चतुर्वेदी यांचे सहयोग यासाठी महत्वाचे राहिले.महाविद्यालयातील विद्यार्थींनीना आईच्या दुधाचे महत्व आणि लाभ यावर सविस्तर माहिती देण्यात आली तसेच शंकाचे निराकरण करण्यात आले.संचालन श्रीमती महाजन यांनी केले.