वाळू माफियाने केला पोलीसांवर हल्ला

0
9

भंडारा,दि.02ः- जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर वाळू माफियाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज घडली.असून पोलीस शिपाई जखमी झाल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.,जिल्ह्यात वाळू उपसा बंद असतानाही अवैध वाळू तस्करांनी हैदोस मांडला आहे. त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस आणि महसूल विभागाने संयुक्त कार्यवाही सुरु केली असून बुधवारच्या सायंकाळी टाकली येथे एक जेसीबी आणि वाळूचे ट्रक पकडून एकूण 37 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी रात्रीच्या गस्तीवर असतांना त्यांना मोहाडी तालुक्यातील बेटाला गावाजवळ  वाळू वाहून नेणारे 2 अवैध ट्रॅक्टर दिसताच त्यांना पकडून मोहाडी पोलीस स्टेशनला नेत असतांना दोन चारचाकी वाहनांनी आलेल्या वाळू तस्करांनी अचानक पोलीस गाडीवर हल्ला चढवीत गाडीची काचे फोडली.त्यामध्ये पोलीस हवालदार सुधीर मडामेच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले.या घटनेमुळे पोलीसांनी आपला जीव वाचवित पोलीस ठाणे गाठले.मात्र वाळु तस्करानी तोपर्यंत ते ट्रक्टर पळवून नेले होते.या अज्ञात आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे.