पोलीस मुख्यालयात शहीद पांडू आलाम सभागृहाचे उद्घाटन

0
23

गडचिरोली,दि.02(अशोक दुर्गम) – भामरागड तालुक्यातील खंडी (नैनवाडी) येथे  ७ आॅगस्ट १९९७ रोजी नक्षल्यांनी पेरून ठेवलेल्या भुसुरूंग स्फोटात सी-६० चे कमांडर पांडू आलाम यांना विरमरण प्राप्त झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पोलीस मुख्यालयाच्या परिसरात शहिद पांडू आत्राम सभागृह उभारण्यात आले असून या सभागृहाचे उद्घाटन मावळते पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, नवनियुक्त पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, डॉ. हरी बालाजी यांच्या उपस्थित शहीद पांडू आलाम यांच्या पत्नी मनाबाई आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून सर्व पोस्ट, उपपोस्ट, पोमके तसेच सी-६० पथक यांच्यामध्ये संघभावना वाढीस लागावी म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले असून त्यातील विजेत्यांना शहिद चिन्ना वेंटा यांच्या नावाने ट्राफी व रोख पारितोशिक देण्याचे नियोेजन करण्यात आलेले आहे. या ट्राफीचा अनावरण सोहळा शहिद चिन्ना वेंटा च्या पत्नी सुनिता वेंटा यांच्या हस्ते शहिद पांडू आलाम सभागृहात पार पडला.
तसेच ३ मार्च २०१८ रोजी पोलीस मुख्यालयात घेण्यात आलेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड या क्रमाांची स्मृती कामय स्मरणात राहावी यादृष्टीने पोेलिस मुख्यालय परिसरात ‘गिनीज रेकार्ड स्टोन’ या नावाने स्मृती स्थळाची स्थापन करून त्यांचे उद्घाटन मावळते पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व नवीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले.