सगरोळी बाजारपेठेतील कामगार साप्ताहीक सुट्टीसाठी एकवटले

0
15
* साईबाबा मंदिरसमोर केले कामबंद आंदोलन
* दर गुरूवारी साप्ताहीक सुट्टीची मागणी
* कामगार संघटना झाली आक्रमक
बिलोली,दि.03ः- तालुक्यातील सगरोळी येथिल प्रसिद्ध असलेल्या बाजारपेठेतील कामगारांनी आपल्याला साप्ताहीक सुट्टी मिळावी या मागणीसाठी गुरूवार दि 2 आँगस्ट रोजी उपोषण केले असून जर साप्ताहीक सुट्टी मिळत नसेल तर आम्ही कामावर जाणार नाही अशी आक्रमक भुमिका घेतल्याने गुरूवारी बाजारपेठेतील बहुतांशी दुकाने बंद होती.
सगरोळी हे बिलोली तालुक्यातील मोठे बाजारपेठ केंद्र म्हणून प्रसिध्द आहे , या बाजारपेठेत जनरल स्टोरअर्स, सोने चांदीचे दुकाने, कापड दुकान,मेडिकल, दवाखाने, किराणा दुकाने, हॉटेल, अशा  प्रकारची अनेक दुकाने आहेत. यामुळे या बाजारपेठेत काम करणाऱ्या कामगारांची सुध्दा संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या वैयक्तिक कामासाठी वेळ मिळावा  पाहुणे , नातेवाईक व मित्रमंडळ यांच्या सुख दुखात सहभाग घेता यावे या उद्देशाने या बाजारपेठेतील कामगार गेल्या अनेक दिवसांपासून दर गुरूवारी साप्ताहीक सुट्टी द्यावी अशी मागणी करीत आहेत मात्र त्यांच्या मागणीकडे व्यापारी वर्गाने दुर्लक्ष करीत असल्याने गुरुवार दि 2 आँगस्ट रोजी बिलोली येथिल साईबाबा मंदिर येथे बाजारपेठेतील कामगार एकत्र एक दिवसाचे काम बंद आंदोलन केल्याने बाजारपेठ दिवसभर बंद होते. जर व्यापारी वर्गांनी कामगारांची मागणी मान्य न केल्यास आम्ही कामावर जाणार नसल्याची आक्रमक भुमिका घेतली आहे. कामगार संघटनांनी करीत असलेली मागणी व्यापारी वर्ग मान्य करेल का ? हा मोठा प्रश्न असून या मागणीवर व्यापाऱ्यांनी काही तोडगा काढून कामगारांना न्याय देतील का ? हा ही प्रश्न दिवसभर बाजारपेठेत केले जात होते. मात्र कामगारांची मागणीला न्याय मिळेल की नाही हे आगामी काळातच कळेल.