शिक्षक बँकेचे सभासद चांगल्या डिव्हिडंट मिळण्याच्या प्रतिक्षेत

0
11

सांगली ,दि.03:- सांगली जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक सहकारी बँक ही जिल्हा परिषद शिक्षकांची कामधेनू म्हटले जाते.जवळ जवळ 6000 सभासद असणारी बँक आहे.बँकेकडे मोठ्या प्रमाणात भागभांडवल असून ही बँक शंभर टक्के वसुली करणारी अ दर्जाची ऑडिट वर्ग असलेली.व वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित झालेली बँक आहे.सध्या बँकेत शिक्षक समिती प्रणित पुरोगामी तरुण मंडळाची सत्ता आहे.आतापर्यंत या तरुण मंडळाने सभासदांना म्हणावें तितके इतर बँकांच्या पत संस्थाच्या मानाने डिव्हिडंट दिला नाही. दर वर्षी 3ते 4 टक्के दराने डिव्हिडंट दिला जात आहे.त्यामुळे सभासद नाराज आहेत.सध्या बँकेचे सभासद कर्जावरील व्याज दर कमी करा असे वारंवार मागणी करत आहेत.इतर बँक आपल्या बँकेपेक्षा दीड ते दोन टक्के कमी दराने व्याज घेतात त्यामुळे बरेच सभासद आपल्या बँकेऐवजी इतर बँकेकडून कर्जे घेत आहेत.सभासदांच्या हितकरिता संचालक मंडळाने इतर बँकाच्या व्याज दराप्रमाणे कमी व्याज द्यावा.तसेच चालू वर्षी सभासदांना चांगला डिव्हिडंट मिळावा तसेच सभासद शिक्षकांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास आपली बँक कर्जदार सभासदाची सहा लाखापर्यंत कर्ज माफ करते. पण शिक्षकांचे कर्जे भरपुर असतात.त्यामुळे जमीनदार यांना नाहक त्रास होतो. त्यामुळे सभासदाच्या मृत्यू नंतर सम्पूर्णकर्ज माफी ची निर्णय घ्यावा.अशी मागणी संघटनेमार्फत मागणी करण्यात आली आहे.यावेळी राज्य उपाध्यक्ष-संतोष काटे,पुणे विभागीय सचिव-प्रल्हाद हुवाळे,तालुकाध्यक्ष-सुनील सूर्यवंशी,सरचिटणीस -संदीप कांबळे,जिल्हाउपाध्यक्ष-मलेशप्पा कांबळे जिल्हासंघटक -दिलीप वाघमारे,कार्याध्यक्ष-महादेव तंगोळी आदी शिक्षक उपस्थित होते.