वरवट बकाल शिवारात चंदन तस्करी रॅकेट सक्रिय

0
25

बुलढाणा,दि.03 : तालुक्यातील वरवट बकाल शिवारात चंदन तस्करी चे रॅकेट सक्रिय झाले आहे. तोडलेली दोन झाडे पकडली. भरदिवसा झाडे तोडणारे मोटरसायकल शेतातच ठेऊन पळून गेल्याची घटना 3 ऑगस्टचे दुपारी घडली. गोपनीय माहितीचे आधारे वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. गाडी आणि तोडलेल्या मालाचा पंचनामा करून 40 हजाराचे चंदन असल्याची माहिती दिली. वरवट बकाल शिवारातील बळीराम संपत ढगे याचे शेताचे धुऱ्यावरील दोन चंदनाचे झाडे तोडणे सुरू असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्या वरून वनपाल एस जी खान सहकारी सोबत दुपारी शेतात पोहचले. शेतात अधिकारी पोहचणे अगोदर झाडे तोडणारे पळून गेले. सदर शेतात एम एच 28 वाय 2054 क्रमांकाची बजाज डिस्कवर गाडी जागेवरच सोडून चंदन तस्कर फरार झाले. वनपाल खान यांनी पंचनामा केला. पंचनाम्यामध्ये ढगे यांनी मी शेगावला दवाखान्याचे कामाने गेलो होतो. शेतात आलेवर शेतातील धुऱ्यावरील चंदनाचे झाडे तोडण्यात आल्याची माहिती वनमजूर चितोडे यांनी माहिती दिली असे ढगे यांनी बयनात नमूद केल्याने तस्करीबाबत तर्क-वितर्क निघत आहेत. घटनास्थळावरून सदर इसम फरार झाले असले तरी मुद्दे माल किंमती चाळीस हजार आणि मोटरसायकल सोडून गेले.