मातंग समाज शिक्षणापासून वंचित राहू नये – रामचंद्र भरांडे

0
15
 बिलोली,दि.05 : शहरातील साठेनगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 98 व्या जयंती निमित्त शुक्रवार दि. 3आॅगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात मातंग समाजाने स्वतःच्या उन्नतीसाठी शिक्षणाचा मार्ग अवलंबवावा व कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये असे अवाहन लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक रामचंद्र भरांडे यांनी  केले.बिलोली शहरातील साठेनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.जयंतीचे औचित्य साधून मातंग समाजाचे तरूण नेतृत्व तथा मुंबई साम टी व्ही चे पत्रकार मुकिंदर कुडके यांनी स्व खर्चाने समाज मंदिरात स्पर्धा परिक्षा अभ्यासिका चालू केली असून याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांंचे सत्कार करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष  लोकस्वराज्य  आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र भरांडे ,  काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी पा. जाधव , भिमराव जेठे, माजी मुख्य वन संरक्षक आय .एफ.एस. वरवंटकर, आमदार प्रतिनिधी विक्रम साबणे,  रावसाहेब पवार, शंकर यंकंम, इंद्रजित तुडमे, अनुप अंकुशकर, पंडीत वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती . डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या कार्यक्रमात रामचंद्र भरांडे यांनी मातंग समाजास सामाजिक , राजकीय , आर्थिक , शैक्षणिक क्षेत्रात उन्नती करायची असेल तर शिक्षणाची कास धरली पाहिजे , धनसंचयीत समाजाला गुलाम बनविले जाऊ शकते पण ज्ञानवंत समाजाला पुर्थ्वी तलावर कोणीही गुलाम बनवू शकत नाही असे  मार्गदर्शन केले. माधव वाघमारे  व  सविता गोदाम यांच्या निळ्या आकाशातील लाल वादळ  या कला पथक संचाकडून प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला, यासमयी  अमृतराव गवलवाड , देवराव गाडेकर , संजय जाधव , नागोराव कुडके , शेषेराव जेठे , चांदु कुडके , पञकार माधव एडके , गंगाधर कुडके , संपादक यादव लोकडे, सय्यद रियाज ,पंढरीनाथ गायकवाड , देविदास कोंडलाडे,  सुनिल जेठे  , संजय धनगरे , संजय पोवाडे ,  कुलदिप सुर्यवंशी , धम्मपाल जाधव ,  भास्कर कुडके , मार्तंड जेठे, बाबू कुडके , गणेश कुडके , प्रल्हाद भंडारे , सह अनेक समाज बांधवाची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते संदिप कटारे यांनी केले,  तर कार्यक्रमाचे सुत्रसंचल मुकींदर कुडके व नागोराव कुडके यांनी केले होते.