एन.एम.डी. महाविद्यालयात युवा संसद १२ आॅगस्ट का आयोजन

0
16
गोंदिया,दि.05: खेळ  व क्रिडा मंत्रालय नवी दिल्ली,एन.एस.एस. विभागीय संचालक नवी दिल्ली यांच्या सुचनेनुसार एन.एस.एस. विभागीय संचालक पुणे यांच्या मार्गदर्शनात नटवरलाल माणीकलाल दलाल महाविद्यालयात जिह्यास्तरीय युवा संसदचे आयोजन १२ आॅगस्ट रोजी करण्यात आले आहे.
युवा संसद स्पर्धेत १८ ते २५ वयोगटातील युवकांचा सहभाग असणार आहे. हे  युवक लोकप्रतिनिधी नियुक्ती करतात परंतु निवडणुकीत राहु शकत नाही. म्हणुन या व्दारे त्यांना संधी देण्यात येते की,त्यांनी संसदेत जाण्यांची प्रक्रिया समजून घेवून अशा युवकांना संसदेतील कामकाजाप्रमाणे स्पर्धेत सहभागी करुन येणे व त्यांच्या समस्या विषयी जागृत करण्याच्या दृष्टीने आयोजन करण्यात आले आहे.
युवा संसद स्पर्धेत स्वच्छता,गरीबी,भ्रष्टाचार,आंतकवाद व राष्ट्रीय सुरक्षा, साप्रदायिकता,जातीवाद,सुशासन,पर्यावरण संरक्षण, या व्यतिरिक्त सरकारचे प्रमुख मुद्े जसे डिजिटल इंडिया,प्रधानमंत्री आवास योजना, बेटी बचाव-बेटी पढाओ,स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, इंद्रधनुष्य व आयुष्यमान भारत, नदी व जमीनीची जोपासना व स्वच्छ नदी, अशा विविध विषयावर ही संकल्पना प्रत्येक जिह्यात राबविण्यात येत आहे ज्यात ३९०००  महाविद्याल्याचा संपुर्ण भारतात समावेश असून एम.वाय.ए.एस. ही एम.एच आर.डी.शी जुडून जिह्यास्तरावर आयोजनासाठी सहकार्य करीत आहेत.
स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्या सोबत २५ वर्ष वयोमर्यादा पर्यत असणाºया युवकांना सहभाग घेता येईल. विद्यार्थी संसद निवडलेल्या स्पर्धेकातून घेतल्या  जाईल. ही निवड वक्तृत्व, अभिव्यक्ती कौशल्य, ज्ञान सामग्री, विचाराची शुध्दता, आचरण,विषय सुचकता, विपक्ष पक्षाला हाताळण्याचे धैर्य  अशा ३०० गुणाच्या आधारावर निवड समिती व्दारे जिह्यातून ४ स्पर्धेकांची निवउ करण्यात येईल. स्पर्धा  केवळ  हिन्दी आणि   इंग्रजी  भाषातून होणार असून सहभागी सर्व स्पर्धकांना आयोजकाच्या वतीने सहभागी प्रमाणपत्र देण्यात येईल.स्पर्धेंकाची नोदंणी १२ आॅगस्ट रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत करण्यात येईल. सहभागी होणाºया युवकांनी जन्मतारखेचा पुरावा नोंदणी च्या वेळी देणे अनिवार्य आहे.
सदर स्पर्धेव्दारा युवकामध्ये  टिकात्मक विचार आणि तार्किक पृथ्यकरण ही संकल्पना निर्माण करुन दिलेल्या मुुद्यावर उत्साहवर्धक चर्चा घडवून शिक्षण संस्थेच्या माध्यमातून चांगले नेते व युवक तयार होवून पुढे संसद मध्ये चांगल्या चर्चा  करण्यासाठी सर्व इच्छुक विद्यार्थीची निर्मिती व्हावी. या करिता स्पर्धेत जास्तील स्पर्धेकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्रा.डॉ रंजनी चतुर्वेदी, नोडल आॅफिसर प्रा. बबन मेश्राम, संयोजक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.शारदा महाजन, विधी विभाणाचे प्रा.उमेश उदापुरे, वाणिज्य विभागाचे डॉ.सरिता उदापूरकर, रासेयो सहा.कार्यक्रम अधिकारी  प्रा. रवि रहांगडाले, प्रा.आशा बघेले यांनी केले असून अधिक माहिती करिता एन.एम.डी. महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागात डॉ. शारदा महाजन यांच्याशी संपर्क करावा.