महसूल कमचारी हा प्रशासनाचा कणा – जिल्हाधिकारी

0
13

गोंदिया,दि.05ः महसूल विभागात कार्यरत प्रत्येक कर्मचारी हा जनसेवक असून प्रशासनीक कामात प्रामाणिकता व पारदशीर्ता कायम करणारा कणा आहे. नागरिकांच्या विविध प्रकारच्या अडीअडचणी समजून मार्गी लावणे हे आपले कर्तव्य आहे. असे प्रतिपादन महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहिम राबवून स्वच्छतेचा संदेश दिला. महसूल दिनानिमित्त क्रिडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गायन स्पर्धा तसेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शुभांगी आंधळे, भु-संपादन अधिकारी राहूल खांडेभराड,उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे व प्रमुख पाहूणे यांच्या हस्ते दिपप्रज्वलीत करून करण्यात आली.
सांस्कृतिक कार्यक्रमात झीलमिल पवार व आदिती बोडके यांनी नृत्याचे सादरीकरण केले तर निराशा शंभरकर, व्रजाली बंसोड,नरेंद्र तिवारी,राजेश बोडखे, ठाकुर यांनी गायन कला सादर केले.तद्नंतर महसूल विभागात सन २0१७-१८ मध्ये उत्कृष्ट कार्य करणार्?या तसेच क्रीडा स्पधेर्तील विजेत्या अधिकारी व कर्मचार्?यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी धार्मिक यांनी१ आपले मनोगत व्यक्त करतांनासांगीतले की, महसूल विभाग हा आपल्या कुटुंबासारखा आहे. तसेच सर्व अधिकारी,कर्मचारी यातील सदस्य आहेत. जरी कामाचा व्याप जास्त असला तरी सर्वांनी मिळून कार्य करायचे आहे. तसेच कार्य करत असतांना आपले परिसर स्वच्छ ठेवणे सुध्दा आपलीच जबाबदारी आहे. सदर कार्यक्रमात तहसीलदार सी. आर. भंडारी,साहेबराव राठोड, अधिक्षक आर. एस. अरमरकर,सहा.अधिक्षक आर. एस. पटले, विश्‍वनाथ चिचघरे, प्रविण जमधाडे, एच. एस. मडावी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे तसेच महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संतोष शेंडे यांनी तर उपस्थितांचे आभार लेखाधिकारी एल. एच. बावीस्कर यांनी मानले.