सरकारच्या जनकल्याणकारी योजनेमुळे देशाचा वेगाने विकास – हेमंत पटले

0
15

तिरोडा,दि.06ः- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यासह देशात भाजपा सरकारने अनेक जनकल्याणकारी योजना व निर्णय घेतले. उज्ज्वला योजना, जनधन योजना, विमा योजना, मुद्रा योजना, आरोग्यसाठी आयुष्मान योजना, शेतकरी कर्जमाफी, पीकविमा, शेतीच्या उत्पादनावर लागत मूल्यपेक्षा दीड पट भाव, धानावर दरवर्षी बोनस, वर्ग दोन ची जमीन वर्ग एक ची करने, जलयुक्त शिवार योजना, प्रधानमंत्री आवास योजना, ओबीसी सह मागास वर्गासाठी घेण्यात आलेले निर्णय, अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करने, विहीर योजना, रस्ते, मुख्यमंत्री सड.क योजना, पुल, नदी सफाई, स्वच्छता अभियान आदी अनेक योजनेमुळे सर्वसामान्याचे जीवन सुखमय झाले व देशाचा विकास वेगाने झालेला आहे. असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी केले.
५ ऑगस्ट रोजी येथील मातोश्री लॉनमध्ये आयोजित भाजपा कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गात समारोपीय सत्रात केंद्र व राज्य सरकारची कल्याणकारी योजना व कामे या विषयावर मार्गदर्शन करतांना बोलत होते.
यावेळी प्रामुख्याने जिल्हा महामंत्री भाऊराव उके, तालुका अध्यक्ष भाऊराव कठाने, माजी जि. प. उपाध्यक्ष मदन पटले, जयंत शुक्ला, दवनीवाडा मंडल अध्यक्ष धनेंद्र अटरे, चतुभरुज बिसेन,विजय ज्ञानचंदानी, अजाबराव रिनायत आदि उपस्थित होते.प्रशिक्षण वर्गाच्या उद््घाटन सत्रात प्रा उमेश मेंढे यांनी भाजपा चा इतिहास, विकास पर्व, जनसंघ ते भाजपा व सध्याची राजकीय स्थिती यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन तालुका महामंत्री डॉ. रामप्रकाश पटले यांनी केले. प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशिक्षण सेलचे जिल्हा संयोजक दीपक कदम, तालुका संयोजक डॉ बसंत भगत, महिला मोर्चा अध्यक्ष तुमेश्‍वरी बघेले, महामंत्री राजेश मलघाटे, दिंगबर ढोक, अनूप बोपचे, प्रभुराज सोनवाने, डॉ चिंतामन रहांगडाले, तेजराम चौहान, जितेंद्र रहांगडाले, सुरेश पटले, रमेश चिल्हारे, गुड्डू लिल्हारे, महेंद्र बघेले, युवा मोर्चा अध्यक्ष गौरीशंकर पारधी, बंटी श्रीबांशी यांनी पर्शिम घेतले. प्रशिक्षण वर्गात तिरोडा तालुका, शहर व दवनीवाडा मंडलाचे पदाधिकारी, कार्यकर्ता मोठय़ा संख्येने उपस्थित होते.