कपडे धुण्याच्या आधुनिक प्लांटला धोबी समाजाचा विरोध

0
21

गोंदिया,दि.09 : अखिल भारतीय धोबी समाज, गोंदियाच्या प्रतिनिधी मंडळाने आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात उपस्थित भंडारा-गोंदिया युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल यांची भेट घेऊन गोंदिया शहरात काही व्यावसायिक कपडे धुण्याचा आधुनिक प्लांट लावून समाजबंधूना बेरोजगार करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती दिली. या प्लांटविरोधात धोबी बांधवांनी आमदार गोपालदास अग्रवाल यांना निवेदन दिले..

निवेदनात म्हटले की, गोंदिया शहरात काही ठिकाणी कपडे धुण्याचा आधुनिक प्लांट लावण्यात येत आहे. यामुळे या व्यावसायाशी जुळलेल्या शेकडो धोबी बांधवांच्या कुटुंबीयांवर बेरोजगारीचे संकट येऊ शकते. यामुळे सदर प्लांट लावण्यात येऊ नये. त्यासोबतच आधुनिक प्लांटधारकांकडून धोबी समाजाला नुकसान पोहोचविण्यासाठी कमी दरात कपडे धुवून देण्यात येत आहे. यामुळे धोबी बांधवांना त्यांचा परंपरागत व्यवसाय बंद करावा लागणार आहे. पुढे आधुनिक प्लांटधारक आपल्या मनमर्जीने कपडे धुण्याचे भाव ठरवून ग्राहकांचे नुकसान करतील. तसेच शेकडो धोबी बांधवांना बेरोजगारीचा सामना करावा लागणार आहे. प्रतिनिधी मंडळाशी विस्तृत चर्चा केल्यानंतर प्रफुल्ल अग्रवाल यांनी निवेदनावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. निवेदन देतेवेळी छत्रपाल कनोजिया, किशोर कनोजिया, दीप कनोजिया, संजय कनोजिया, चंद्रकिशोर चौधरी, रामू कनोजिया, हरिचंद कनोजिया, कैलाश कनोजिया, राजेश कनोजिया, श्याम कनोजिया, राजेश्वर कनोजिया, दिनेश कनोजिया, पंकज कनोजिया, रोहित कनोजिया, मनिष कनोजिया, ग्यानचंद कनोजिया, मदनलाल कनोजिया, प्रमोद कनोजिया, बबलू कनोजिया, सुनील कनोजिया, अशोक कनोजिया, सुनील परदेशी, कचरू कनोजिया, श्याम कनोजिया, दीपक कनोजिया, रेखा कनोजिया, आशा कनोजिया, जयमाला कनोजिया, प्रतिभा कनोजिया, रूख्मिणी कनोजिया, शोभा कनोजिया, सुषमा कनोजिया, रीना कनोजिया, मोतिका कनोजिया उपस्थित होते..