अवयव दान करून जवानांनी जपले सामाजिक दायीत्व

0
13

गडचिरोली,दि.09 – आपल्या देशात शारिरीक, आर्थिक आणि मानसीक विकासात नक्षलवाद चळवळीमुळे  मोठी समस्या निर्माण झाली आहे.  केंद्रीय राखीव पोलिस दल तथा राज्य पोलिस आंतरीक सुरक्षेत  प्रतिकुल परिस्थितीत सुध्दा सतर्क राहून रक्षण करतात.जवानांनी  मृत्युनंतर अवयव दान करुन सामाजिक दायीत्वाची भावना जोपसल्याचे प्रतिपादन केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महानिरीक्षक राजकुमार यानी केले.

औद्योगिक विकास परिसरातील सी.आर.पी.एफ. प्रशिक्षण केंद्रात आंतरीक सुरक्षा पदक प्रदान आणि अवयव दान कार्ड वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी  पोलीस उपमहानिरीक्षक टी. शेखर, अंकुश शिंदे,  केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अधिकारी  प्रभाकर त्रिपाठी, रवींद्र भगत, एन. शिवा संकरे, राम मीणा, पोलीस अधिक्षक शैलेंद्र बलकवडे, दिपककुमार साहु, कुलदिप सिंह खुराना, टी. के. सोळंखी, महेश्वर पंडीत, कैलाश गंगवो आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

राजकुमार म्हणाले की, नक्षल प्रभावीत क्षेत्रात काम करीत असतांना नक्षल्यांनी  भुसुरुंगाचा वापर करुन जीवित हानी करीत आहेत.  तेव्हा आपल्या जवानांना आधुनिक तांत्रिक ज्ञान देत माहिती अवगत करुन, सर्व सर्चींग आॅपरेशन माहितीचे ज्ञान प्रशिक्षणाव्दारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याच्या मंजुरीसाठी तत्कालीन पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनीही सातत्याने पाठपुरावा केला. या प्रशिक्षण उपक्रमास शासनानी मंजुरी प्रदान केली. १४ आॅगस्ट पर्यंत १५ केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान आणि राज्याचे १५ जवानाना या सहा दिवसाच्या प्रशिक्षणात सर्व आधुनिक तांत्रिक बाबींची माहिती देण्यात येत याप्रसंगी उत्मरित्या कर्तव्य पार पाडलेल्या अधिकारी व जवानांना  आंतरीक सुरक्षा पदक प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.  तसेच स्वेच्छेने अवयव दान करण्याचे घोषीत केले आहेत त्यांना सर्व इतंभुत माहितीचे स्मार्ट कार्ड पोलिस महानिरिक्षक राज कुमार यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.या कार्यक्रमात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन उप कमांडंट पतन सुमन यांनी केले.