डी.एल.एड.प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश विशेष फेरीद्वारे प्रवेश

0
17

गोंदिया,दि.९ : सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरीता प्राथमिक शिक्षण पदविका (ऊ.एश्र.एव) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण चार फेऱ्या घेण्यात आल्या तथापी अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीद्वारे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येतील. प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश होईल. यासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे यांच्या ुुु.ारर.रल.ळप या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज करु शकतात. याबाबत सविस्तर सूचना, पडताळणी केंद्राची यादी, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरुन र्अििीेींश करुन घेतला आहे, परंतू प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपुर्ण किंवा दुरुस्तीमध्ये आहे तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले उमेदवार अर्ज पूर्ण भरु शकतात. पडताळणी केंद्रावर जाऊन अर्ज ऑनलाईन र्अििीेींश केल्याशिवाय उमेदवाराचा प्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याने स्वत:च्या लॉगीनमधूनच प्रवेश घ्यावयाच्या अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करुन लगेचच प्रवेशपत्र स्वत: ई-मेल/लॉगनीमधून प्रिंट घेवून अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष प्रवेश घ्यावा. यानंतर (ऊ.एश्र.एव) प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. असे एन.पी.शेंडकर, सदस्य सचिव, राज्यस्तरीय डी.एल.एड. प्रवेश निवड, निर्णय व प्रवेश सनियंत्रण समिती पुणे यांनी कळविले आहे.