प्रफुल्ल पटेल उद्या जिल्ह्यात.

0
8

गोंदिया,दि.10: भंडारा-गोंदिया जिल्ह्यात आयोजित विविध कार्यक्रम व शासकीय बैठकांसाठी खासदार प्रफुल्ल पटेल व खासदार मधुकर कुकडे ११ ऑगस्ट रोजी गोंदिया व 12 आॅगस्ट रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. खासदार प्रफुल्ल पटेल ११ ऑगस्ट रोजी अर्जुनी/मोरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित बुथ कमेटी सदस्य व कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहतील. यावेळी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, राकाँचे जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, प्रदेश प्रतिनिधी मनोहरराव चंद्रिकापुरे उपस्थित राहणार आहेत. या भेटीत ते भंडारा जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष सुनिल फुंडे व तुमसर येथे माजी खासदार स्व.केशोराव पारधी यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत.