क्रांतीदिनी वृक्षांचा २५ वा वाढदिवस साजरा

0
20

लाखनी,दि.10ः- रेंगेपार/ कोहळी येथे आज वृक्षमित्र मंडळ या सामाजिक संस्थेद्वारे १९९३ ला ८ हेक्टर परिसरात सामाजिक वन विभागाच्या सहकार्याने ५००० झाडे लावण्यात आली होती. त्यासर्व झाडांचा २५ वा वाढदिवस आज रेंगेपार येथील राजहंस रोपवाटिकेत साजरा करण्यात आला. झाडांचा वाढदिवस सेंद्रिय खत, शेण खत झाडांना देऊन वृक्ष प्रेम याठिकाणी जपल्या गेले. झाडे लावण्यापेक्षा झाडे जगवणे ही बाब गावकऱ्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. या वृक्षांच्या वाढदिवस साजरा करण्याबरोबर ५०० झाडांचे ५०० नागरिकांनी एकाच वेळी वृक्षारोपण करण्यात आले. अशा प्रकारचा अद्वितीय सोहळा शेणाचा केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी क्रांतिदिनानिमित्य शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार डॉ हेमकृष्ण कापगते, माजी जिल्हाध्यक्ष डॉ श्याम झिंगरे, सौ गीता कापगते, डॉ उदय राजहंस, डॉ प्रतिभा राजहंस, श्यामपाटील खेडीकर, डॉ गजानन डोंगरवार, भारतीय किसान संघाचे अध्यक्ष रामदास सारवे, अडो कोमलदादा गभणे, संदीप भांडारकर, यादवराव कापगते, देवचंद नागपुरे, दिगंबर सारवे, पांडुरंग कापगते, हेमराज कापगते,होमदेव कापगते, मुक्ताबाई बोरकर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्यवाह यादवराव कापगते, संचालन लक्ष्मीकांत कापगते आणि आभार श्रावण कापगते यांनी मानले.