गोंदिया विमानतळावरुन सुरु करा विमानसेवा-खा.नेते

0
10

गोंदिया,दि.10ः-पुर्व विदर्भातील गोंदियापासून काही अंतरावर असलेल्या बिरसी विमानतळावरुन डोमेस्टिक विमानसेवा सुरु करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात असून गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते यांनी नागरी उड्डणमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन यासंबधीचे एक निवेदनही सादर केले आहे.गोंदियातील विमानतळ हे मोठे विमानतळ असून याठिकाणी पायलट प्रशिक्षण केंद्र सुरु आहे.नागपूर व रायपूर विमानतळाएवढीच धावपटटी असून रात्रीला विमान उतरण्याची सुविधा असणारे हे ठिकाण आहे.मध्यप्रदेशातील सर्वच नेते याच विमानतळावर उतरुन बालाघाट,छिंदवाडा,सिवनीकडे जातात.त्यातच लागूनच नागझिरा व्याघ्रप्रकल्प,कान्हा केसरी व्याघ्रप्रकल्प,मलाजखंड मायनिंगसारखे प्रकल्प असल्याने या विमानतळावरुन सुरवातीला 20 अासनी विमानसेवा सुरु केल्यास चांगला प्रतिसाद मिळू शकतो.त्यामुळे खासदार नेते यांनी पुढाकार घेत प्रभू यांना गोंदियाच्या विमानतळावरुन विमानसेवा सुरु करण्याची मागणी केली आहे.