जिल्ह्यातील समस्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेचे आंदोलन

0
8
गोंदिया,दि.१०ः- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने गोंदिया जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन तसेच जिल्ह्यात फोपावत असलेल्या गुंडगीरीच्याविरोधात आज शुक्रवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
मनसेच्यावतीने ज्या मुद्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले,त्यामध्ये शासनातर्फे बनवण्यिात आलेल्या शेत विहिर कामातील घोळाची चौकशी करण्यात यावे.मुद्रा योजने अंतर्गत बेरोजगारांची होणारी फसवणूक थांबविण्यात यावे.बँकाद्वारे अनावश्यक कागदपत्रांची होणारी मागणी बंद करण्यात यावे.पिकविमा योजनेंतर्गत शेतकèयांची गैरसोय थांबविण्यात यावे.मनोहर सागर जलाशयाजवळील गावांमध्ये पाण्याची सोय करण्यात यावे.जनहितार्थ काम करणारे समाजसेवी ब्रजभूषण बैस यांच्यावर करण्यात आलेल्या हल्यातील आरोपींना पकडण्यात यावे.तलावांचे खोलीकरण आणि सौंदर्यींकरण करण्यात यावे.जयस्तंभ चौक येथील प्रवासी निवाèयात सोयी उपलब्ध करण्यात यावे.गंगाबाई रुग्णालयातील समस्या सोडविण्यात यावे.नव्या उड्डाण पुलावरचे पाणी मुख्य रस्त्यावर पडत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाल्याने बंदोबस्त करण्यात यावे.पाल चौक ते कुडवा नाका रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे.शिक्षकांना जनगणना तसेच निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे आदी मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले.कोट्यावधी रुपये खर्चून जिल्ह्यात ग्रामपंचायत क्षेत्रात वृक्षलागवड करण्यात आली.परंतु ५ टक्केही वृक्ष जिवंत नाहीत.त्यामुळे वृक्षलागवड योजनेची चौकशी करून दोषी ग्रामसेवकावर कार्यवाही करून निलंबित करण्यात यावे.वनविभागाअंतर्गत वनतलाव व खोदतळे बांधण्यात आले. त्यात बोगस मजुराचे नाव रेकॉर्डवर टाकून पैसे गहाळ करण्यात आले.तसेच नित्कृष्ठ दज्र्याचे बांधकाम केल्यामुळे जिल्ह्यात बरेच वनतलाव पावसाच्या पाण्याने वाहून गेल्याने चौकशी करुन संबंधित वनक्षेत्र अधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली.आंदोलनात मनसे जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे, जिल्हा उपाध्यक्ष लेखू रहांगडाले, मिलन रामटेककर, मुकेश मिश्रा, जिल्हा सचिव निखील ढोंगे, गोंदिया तालुकाध्यक्ष सुरेश ठाकरे, सालेकसा तालुका अध्यक्ष ब्रजभूषण बैस, आमगाव तालुकाध्यक्ष मुन्ना गवळी, देवरी तालुका अध्यक्ष शैलेश राजनकर, सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष बबन बडोले, गोरेगाव तालुका अध्यक्ष शैलेश जांभूळकर, तिरोडा तालुका अध्यक्ष राजेश गोटेफोडे, गोंदिया शहर अध्यक्ष  उदय पोफळी, राजेश नागोसे, सालेकसा शहर अध्यक्ष राहुल हटवार, गोरेगाव शहर अध्यक्ष यासीन शेख, गोंदिया शहर उपाध्यक्ष क्षितीज वैद्य, उदय काळे,पिंटू कटरे, देवीलाल रावते यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.