उपसरपंच्या घरात घुसून दारू तस्करांची तोडफोड

0
14

घुग्गुस,दि.11ः- नकोडा उपसरपंच यांच्या घरात घुसून दारू तस्करांची तोडफोड केल्याची घटना मंगळवारला रात्री ८.४0 वा दरम्यान नकोडा चौकात घडली. नकोडा ग्रा.पं. उपसरपंच हनीफ मोहम्मद रोशन घराकडे परत जात असताना नकोडा चौकात एका इसमाशी बोलत असतानाच तिथे येऊन छोटु शेख, शरीफ शेख, अली अहमद रा.नकोडा यांनी आम्ही दारू विकतो, तु काय करतो, असे म्हणून ईल शिवीगाळ करीत धमकी देऊन वाद घातला. लगेच हनीफ मोहम्मद यांनी घुग्गुस पोलिस स्टेशनकडे धाव घेतली असता, त्यांच्या घरात घुसून ७ ते ८ दारू तस्करांनी खुर्ची व भांडे फेकफाक केली व विटा फेकून मारल्या तसेच पत्नी व मुलीस हात धरून ओढले. त्यामुळे घाबरून पत्नी व मुलीने ही घुग्गुस पो.स्टे.गाठुन घडलेली हकीकत सांगितली. परंतु, उपसरपंच हनीफ मोहम्मद यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत पोलिसांनी त्यांना रात्री उशिरापयर्ंत बसवून ठेवले व कलम ५0६,५0४ अदखल पात्र गुन्हा नोंद करून त्यांना परत पाठविण्यात आले.
नकोडा येथील हल्लेखोरांवर दारू तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहे. घुग्गुस येथील पत्रकार बांधवांनी या घटनेचा निषेध केला. पत्रकारावर हल्ला करण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, पत्रकार बांधवांनी केली आहे.