शिक्षकाने के ला पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

0
9

तुमसर,दि.11ः-मानसिक त्रासाला कंटाळून एका शिक्षकाने शाळेतच स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. वेळीच सहकारी शिक्षकांनी धाव घेतल्याने त्याचा हा प्रयत्न फसला. शहरातील जनता विद्यालयात शुक्र वारी घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. याप्रकरणी सदर शिक्षकावर तुमसर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
अनिल पतिराम मेश्राम (४0) रा. नागपूर असे या शिक्षकाचे नाव आहे. अनिल मेश्राम हे शुक्र वारी सकाळी जनता विद्यालयात आले. त्यांनी सोबत पेट्रोलची बाटली सोबत आणली होती. त्यानंतर शाळेत मला मानसिक व आर्थिक त्रास देऊन अपमानास्पद वागणूक देत असल्याचे म्हणत पेट्रोलची बाटली काढली व पेट्रोल अंगावर घेतले. आग लावण्यासाठी आगपेटी घेतली तेवढय़ात सहकारी शिक्षकांनी त्यांचा हात पकडला. या घटनेने विद्यालयात एकच खळबळ उडाली होती. याबाबत मुख्याध्यापकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अनिल मेश्राम यांना ताब्यात घेतले.
अनिल मेश्राम यांनी आपल्या तक्रारीत मानसिक, आर्थिक व अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरेाप केला आहे. तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचेही म्हटले आहे. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी मेश्राम यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.