मौदा ‘एनटीपीसी’ला स्वच्छता अवॉर्ड

0
13

मौदा,दि.11ः- नगर पंचायतद्वारा राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २0१८ अभियानात उल्लेखनीय सहकार्य केल्याबद्दल मौदा एनटीपीसी प्रकल्पाला स्वच्छता पुरस्कार देऊन नुकतेच गौरव करण्यात आला.
स्वच्छ सर्वेक्षण २0१८ अभियानात मौदा नगर पंचायतिला देशात ५४ वा तर पश्‍चिम क्षेत्रात ३३ वा क्रमांक प्राप्त झाला. या स्वच्छता अभियानात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल एनटीपीसीला पालकमंत्री व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते स्वच्छता पुरस्कार प्रदान करण्यात आला. मौदा येथील राधाकृष्ण सभागृहात वरिष्ठ प्रबंधक आनंद गडगडे आणि टाऊनशिप अँडमिनिस्ट्रेसन प्रबंधक आशीष जैन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
एनटीपीसी महाप्रबंधक आर. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आवासीय परिसर व प्रकल्पात स्वच्छतेविषयी विशेष काळजी घेतली जाते. तसेच अनेक कार्यक्रम राबविले जातात. देशभरात राबविल्या गेलेल्या स्वच्छता अभियानात एनटीपीसीने मोलाचे योगदान दिले आहे. प्रकल्प परिसरात १00 टक्के कचर्‍याचे निस्तारीकरण केले जाते. त्यामुळेच एनटीपीसीला पुरस्कार प्राप्त झाला आहे.