संविधानाची प्रत जाळल्याप्रकरणी संघटनेविरोधात गुन्हा दाखल

0
14

नवी दिल्ली ,दि.11- राजधानी नवी दिल्लीमध्ये एका आंदोलनात संविधानाची प्रत जाळल्याच्या आरोपात पोलिसांनी संबंधित संघटनेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या संघटनेच्या सदस्यांनी शुक्रवारी संविधानाची कॉपी जाळत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि एका समुदायाच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी केली होती.

अखिल भारतीय भीम सेनेच्या वतीने संसद मार्ग पोलिसांमध्ये या प्रकाराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावर तपास करत पोलिसांनी कारवाई केली. संघटनेच्या सदस्यांनी संविधानाची प्रत जाळत आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. तक्रार करणाऱ्यांनी पोलिसांनी एक सीडीदेखिल दिली आहे. या सीडीमध्ये या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ असल्याची माहिती मिळत आहे.संविधानाची प्रत जाळल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. त्याचबरोबर संविधानाचा अनादर केल्यास काही विशेष प्रकरणामध्ये नागरिक्त्व काढून घेतले जाऊ शकते.