प्रसंगी ओबीसींसाठी राजीनामा देणार!

0
5

गडचिरोली,दि.12 : जिल्हाच्या बाराही तालुक्यात भारतीय जनता पार्टीने कार्यकर्त्यांकरिता प्रशिक्षण सुरू केले आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर विचारमंथन करण्याकरिता स्थानिक कॉम्प्लेक्सस्थित विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी ओबीसींच्या न्याय हक्कासाठी प्रसंगी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. जिल्ह्यातील भाजपा ओबीसी सेलच्या सर्वस्तरावरील पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी (११ ऑगस्ट) पार पडली. या बैठकीला जि. प. अध्यक्ष योगिता भांडेकर, आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, आ. रामदास आंबटकर, यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेच्या सत्तेत असलेले ओबीसी पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी कार्यकर्त्यांनी ओबीसींसाठी काय केले, असा जाब लोकप्रतिनिधींना विचारला. जिल्ह्यातील स्थिती लक्षात घेऊन भाजपाची सत्ता असताना सुद्धा न्याय मिळाला नसल्याची खंत यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. अप्रत्यक्षरित्या आमदारांवर कार्यकर्ते ओबीसींच्या विविध मुद्यांवर रोष व्यक्त करीत मुद्दा ताणून धरला. अखेरीस आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे यांनी प्रसंगानुसार ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आपण राजीनामा देण्यास कधीही तयार असल्याची ग्वाही दिली. .