महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे आमदार व तहसीलदारांना निवेदन्

0
9

गोंदिया दि.१२ः: १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त झालेल्या राज्यातील सर्व कर्मचाNयांना जुनी पेंशन योजना लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने आवाहन केल्याप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील सर्व आमदार तसेच तहसीलदारांमार्पâत महाराष्ट्र शासनाला निवेदन सादर करण्याचे ठरविण्यात आले
होते. त्यानुरुप  (दि.११) महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना गोंदिया कार्यकारिणीच्या वतीने आमदार गोपालदास अग्रवाल तसेच गोंदियाचे तहसीलदार सी.आर. भंडारी यांना निवेदन सादर करण्यात आले.१ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचाNयांना म.रा.ना.से. अधिनियम १९८२ व १९८४ अंतर्गत जुनी पेंशन लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र मंत्रालय मुंबईवर पेंशन दिंडी व सामूहिक उपोषण आंदोलनास भेट देणे. सदर मागणीचा पाठपुरावा करणेबाबत जिल्ह्यातील सर्व आमदार व तहसीलदार यांच्यामार्पâत शासनाला निवेदन सादर करण्याचे संघटनेच्या वतीने ठरविण्यात आले होते. त्यानुरुप जुनी पेंशनच्या मागणीकरिता महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन
हक्क संघटना जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे आमदार गोपालदास अग्रवाल व तहसीलदार सी.आर. भंडारी यांना आज निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष रामटेके, सुनील राठोड, शालिक कठाणे, संजू उके, चंदू दुर्गे, कु. ममता ठकरेले, हितेश सोमवंशी, मुकेश रहांगडाले व संघटनेचे इतर पदाधिकारी
उपस्थित होते.