ओबीसीच्या यादीत पवार शब्द समावेशासाठी मंत्र्यांना निवेदन

0
10

गोंदिया,दि.१२ः-महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्ये वास्तव्यास असेलल्या पोवार(पवार)समाज ओबीसी प्रवर्गात येत असून केंद्र व राज्याच्या यादीत पोवारयपवार असे नाव समाविष्ठ होते.परंतु गेल्या दोनवर्षापुर्वी यादीतून अचानक पवार शब्द गहाळ करण्यात आल्याने समाजातील विद्याथ्र्यांना त्याचा फटका बसू लागला.या बाबीचे गांभार्य लक्षात घेत माजी खासदार व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय समन्वयक डॉ.खुशालचंद्र बोपचे यांनी नुकतेच महाराष्ट्राचे ओबीसी मंत्री प्रा.राम शिंदे यांची भेट घेत ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिले.सोबतच त्यांना यापुर्वीचे पुरावेदाखल कागदपत्र निवेदनासोबत दिले.त्यावर प्रा.शिंदे यांनी सदर मुद्दाकरीता केंद्रसरकारकडे विशेष करुन पाठपुराव करण्याचे आश्वासन दिले.यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे युवाअध्यक्ष मनोज चव्हाण उपस्थित होेते.