लोधी समाजाचे प्रफुल्ल पटेलांना निवेदन

0
16

गोंदिया,दि.13 : लोधी समाजाला महाराष्ट्र शासनाने संघर्षानंतर राज्यात ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात आला. केंद्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य सूचीत लोधी, लोधा, लोध समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे समाजाला केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे त्यांना अनेक योजनापांसून वंचित राहावे लागत आहे. तेव्हा या समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांना निवेदन देण्यात आले.दरम्यान खासदार पटेल यांनी लोधी समाजाच्या इतर जातींचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन लोधी समाजाच्या प्रतिनिधी मंडळाला दिले. प्रतिमंडळात पुनाजी लिल्हारे, कुंदन कटारे, आशिष नागपुरे, घनश्याम मस्करे, योगराज लिल्हारे, कान्हा बघेले, नरेख चिखलोंढे, बाबा परमवारक, सुरेंद्र नागपुरे, धीरज उपवंशी, झनकलाल ढेकवार, शिव नागपुरे, पुनाप्रसाद लिल्हारे, रूपलाल चिखलोंढे, मुकेश नागपुरे, गज्जू लिल्हारे, आकाश नागपुरे, अंगलाल कटरे, मोहनलाल शेंद्रे, शिवराम सुलाखे, शिव नागपुरे, अजय हिरापुरे, आकाश नागपुरे, पारस बघेले, सियाराम मंडाले व अन्य उपस्थित होते..