भगवान बुद्धाच्या आचरणात समर्पित आपले जीवन – पालकमंत्री बडोले

0
24
दीक्षाप्राप्ती नंतर आगमनावर ना बडोले यांचे स्वागत
सडक अर्जुनी : तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा भारतात जन्म झाला व त्यांनी संपूर्ण जगाला प्रज्ञा, शील व करुणा या आचरणाचा संदेश दिला. या आचरणाला आत्मसात करून बुद्धाचा संदेश भारत वर्षातही घरोघरी पोहचावा तथा आपला मानव जीवन बुद्धाने दिलेल्या संदेशात समर्पित राहावा या उद्देशाने आपण ही दीक्षा घेतली आहे. असे मत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. ते थायलंड येथून श्रामनेर दीक्षा घेतल्यावर प्रथम आगमनावर 11ऑगस्ट  रोजी येथील जनसंपर्क कार्यालयात स्वागत कार्यक्रमात बोलत होते. या वेळी प्रामुख्याने अर्जुनी मोरगावच्या  माजी जि प उपाध्यक्ष रचनाताई गहाने, पं स सभापती अरविंद शिवणकर, सडक अर्जुनी पं स सभापती गिरधारी हत्तीमारे, भाजपा जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर, भाजपा तालुका अध्यक्ष विजय बिसेन, माजी सभापती कविता रंगारी, जि प  सदस्य शिला चव्हाण, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष रतन वासनिक,  पं समिति उपसभापती राजेश कठाने, लक्ष्मीकांत धमगाये, गुड्डू डोंगरवार, चेतन वडगाये, अजित मेश्राम, राहुल रामटेके, व्यंकट खोब्रागडे, संदीप कापगते आदि उपस्थित होते.
या प्रसंगी सर्वप्रथम पालकमंत्री बडोले यांनी भागवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून प्रार्थना केली. उपस्थितांनी पालकमंत्री बडोले यांचे पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.