शासकीय नोकरी सांभाळत हरीणखेडेंनी केली ऊस पिकाची शेती

0
76

गोरेगाव,दि.13 – तालुक्यातील कटंगी बुजरुक येथील निवासी आणि जिल्हा परिषदेच्या लेखा विभागात नोकरीला असलेले सध्या घडीला गोरेगाव पंचायत समितीमध्ये कार्यरत उच्च शिक्षित शेतकरी फनेद्र नत्थु हरीणखेडे यांनी पारंपरिक धान शेतीबरोबर ३ एकर शेतजमिनीत २६५, २३८ या ऊस वाणाची लागवड केली अाहे.ऊसाच्या पीकापासून वर्षाकाठी ११ लाखाचे नफा मिळणार असल्याचे हरिणखेडे यांचे म्हणने असून गेल्या तीन चार वर्षापासून ते शेतीव्यवसायाकडे विशेष लक्ष देऊ लागले आहेत.

फनेद्र हरीणखेडे यांची १४ एकर शेतजमिन अाहे. यात ९ एकरावर भात पीक लावतात, १ एकरात सागवण झाडे लावले असुन ४ एकर शेतीत भाजीपाला उत्पादन घेतले. पण भाजीपाला पिकांना बाजारभाव नसल्याने व भात पीक एकरी लागवडी खर्चापेक्षा उत्पन्नात वाढ होतांना दिसुन आली नाही. त्यामुळे प्रयोग तत्वावर ऊस पीक घेण्याचे ठरविले. सर्वप्रथम साखर कारखाना यांच्यासी करार करुन ३ एकर शेतीत २६५,२३८ या वाणाची लागवड केली ही लागवड करतांना एकरी ऊस बियाने खर्च ११ हजार रुपये व ३० हजार रुपये इतर खर्च आले व पाणी पुरवठा ठिबक सिंचन पद्धतीने केल्याने पाण्याची बचत होत आहे. पिकाच्या वाढीनुसार एका एकरात ६०० टन ऊस पिकाचे उत्पादन होणार अाहे. प्रती क्विटल २२०० रुपये भाव मिळत आहे. एकदा ऊसाची लागवड केल्यानंतर ३ वर्षापर्यत उत्पादन काढता येत असल्याने लागवडी खर्च हा कमी येतो व उत्पन्नात वाढ केली जावु शकते. सागवण झाडापासुन दरवर्षी उत्पन्न काढता येत नाही. त्यामुळे फारसा उत्पन्नात वाढ करता येत नाही. पाण्याची विल्हेवाट करण्यासाठी स्वय खर्चाने शेततळी तयार केले आहे. यात मासे उत्पादन करीत आहेत व लालचंदन, चिकु, विदेशी आवळा, रुद्राक्ष, सम्मी, लालपेरु, अंजीर, हापुस आंबे, कडुनिंब या झाडांची लागवड धुऱ्यावर केली आहे. यामुळे चोरी व मजुरावर देखरेख करण्यासाठी ५ सी सी टिव्ही कॅमरे बसविले आहे. तालुक्यात हा नवीनच प्रयोग असल्याने अनेक शेतकरी या फॉर्म हाऊसला भेटी देत आहेत. ऊसाची लागवड ही पहील्यांच केली आहे. पण एका ऊसाला १० ते १२ फुटवे असल्याने भरघोष उत्पादन होणार अाहे. तसेच इतर लागवडी खर्च येणार नाही. त्यामुळे नफ्यात वाढ होणार आहे. चंदनाच्या काड्यांचा भाव ६ हजार रुपये असल्याने त्याचेही उत्पन्नात वाढ होणार असल्याची माहिती फनेद्र हरीणखेडे यांनी दिली