राज्यघटनेची विटंबना करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

0
8
ओबीसी संघर्ष कृती समिती,सेवा संघ व बहुजन एकता मंचचे निवेदन
गोंदिया,दि.13-  संविधान जाळणे, फाडणे व भारताच्या संविधानाला शिवीगाळ करणे आदी कृत्य करणाNयांवर देशद्रोही व एस. सी, एस. टी. अ‍ॅक्ट नुसार कडक शासन करावे यासाठी गोंदिया येथे ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ व बहुजन एकता मंचच्यातीने  संबंधित  दोषींवर कडक कारवाई करण्यासंबधीच्या मागणीचे निवेदन राष्ट्रपती,प्रधानमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकारी यांच्या मार्फेत देण्यात आले.जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांनी शिष्टमंडळाचे म्हणने एैकत संबधित निवेदन पाठविण्याचे आश्वासन दिले. याबाबत सादर करण्यात आलेल्या निवेदनानुसार, दि. ९ ऑगस्ट २०१८ रोजी दिल्ली येथे जंतरमंतर मैदानात स्वतःला सवर्ण समजणार्या काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळली आहे. तसेच आदर्श व्यक्ती बद्दल अपमानकारक शब्दांचा वापर करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. असे कृत्य हे कायद्यानुसार गुन्हा असून सदर समाजकंटकांने सोशल मीडियावर या संबंधितांचे फोटो, व्हीडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल केले. राज्यघटनेने प्रत्येकाला समानसंधी देत न्याय अधिकार मिळवून दिले आहेत.जे विरोध करीत आहेत त्यांनाही राज्यघटनेने सरंक्षण दिलेले असताना व राज्यघटना जाळणे हा देशद्रोह असल्याने त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदन सादर करतेवेळी  ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,कार्याध्यक्ष अमर वराडे,सुनीता हुमे,ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे,मार्गदर्शक खेमेंद्र कटरे,उपाध्यक्ष कैलास भेलावे,शिशिर कटरे, श्रावण राणा,गोरेगावचे नगराध्यक्ष आशिष बारेवार,बहुजन एकता मंचचे सुनिल भोंगाडे,रवी भांडारकर,संतोष वैद्य,शैलेष बहेकार,महेंद्र बिसेन,प्रेमलाल साठवणे,गायधने,एम.बी.रहागंडाले,राजेश नागरीकर,लक्ष्मण नागपूरे आदी  ओबीसी संघर्ष कृती समिती,सेवा संघ व बहुजन एकता मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.