श्रमिक पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

0
18

गोंदिया,दि.14:- श्रमीक पत्रकार संघ गोंदियाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १५ आॅगस्ट रोजी टिळक गौरव पुरस्काराचे वितरण तसेच जिल्ह्यातील १० वी व १२ वी च्या परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. श्रमीक पत्रकार संघाच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारां च्या विविध गटातील स्पर्धेसाठी प्रवे-ि शका आमंत्रित करण्यात आल्या होत्या. पुरस्कार निवड समितीच्या वतीने या प्रवेशिकांची छाननी करून यावर्षीच्या श्रमिक पत्रकार संघाचे पुरस्कार कार्यक्रमाचे संयोजक सावन डोये यांनी जाहिर केले आहेत.

यावर्षीचा टिळक गौरव पुरस्कारासाठी वरिष्ठ पत्रकार व लोकमत समाचारचे उपसंपादक विकास बोरकर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली असुन स्व. मनोहरभाई पटले स्मृती संपादकिय पुरस्कारासाठी मराठी दैनिक लोकजनचे संपादक एच.एच. पारधी, स्व. पंडीत शंकरलाल शर्मा वृत्तवा-ि हनी पुरस्कारासाठी प्रथम पुरस्कार एबीपी माझाचे प्रतिनिधी हरिश मोटघरे तर व्दितीय पुरस्कार न्युज नेशन टीव्हीचे ओमप्रकाश सपाटे, स्वातंत्र्य सैनिक स्व. हिरालाल जैन स्मृती उत्कृष्ट विकास वार्ता पुरस्कारासाठी प्रथम पुरस्कार दै. भास्कर खातियाचे प्रतिनिधी जितेंद्र उत्तम मेश्राम तर व्दितीय पुरस्कार देशोन्नती सालेकसा प्रतिनिधी पवण पाथोडे, स्व. संतोष अग्रवाल स्मृती शोध वार्ता पुरस्कारासाठी प्रथम पुरस्कार साप्ताहिक विदर्भ व त्यांचे प्रतिनिधी राधाकिशन राघोबा चुटे आमगाव व व्दितीय पुरस्कार दै. सकाळ सडक अर्जुनी प्रतिनिधी आर.व्ही. मेश्राम तर उत्कृष्ठ छायाचित्रासाठी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दिल्या जाणा-या पुरस्कारासाठी आमगावचे दैनिक लोकमत समाचारचे प्रतिनिधी रितेश किशोरीलाल अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे १२ वीच्या परीक्षेत गोंदिया जिल्ह्यातुन प्रथम आलेल्या अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी जयंत धर्माजी लोणारे ९७.६९, व्दितीय अभय देवराम चांदेवार सरस्वती कनिष्ठ विद्यालय अर्जुनी मोर. ९७.०८, व १० वी च्या परीक्षेत जिल्ह्यातुन प्रथम आलेले अवंती अजय राउत सरस्वती विद्यालय अर्जुनी/मोर. ९७.६०, व व्दितीय तनमय रामेश्वर खोब्रागडे सरस्वती विद्यालय अर्जुनी/मोर. ९७.२, व सलोनी योगेश पालीवाल जी.एम.व्ही. इंग्लीश हायस्कुल अर्जुनी/मोर. ९७.२, यांचा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे.

श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मागील ९ वर्षापासुन सातत्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असुन मागील नउ वर्षात जिल्ह्यातील सुमारे ७४ पत्रकारांना पुरस्कृत करण्यात आले आहे. या वर्षीही स्पर्धेसाठी जिल्ह्यातील अनेक पत्रकारांनी उत्स्फूर्तरित्या प्रवेशिका पाठवुन सहभाग घेतला. परीक्षक म्हणुन कार्यक्रमाचे संयोजक सावन डोये, श्रमिक पत्रकार संघाचे मार्गदर्शक हाजी अल्ताफ शेख, कार्यकारिणी सदस्य महेंद्र माने, सुरेश येळे, यांनी जबाबदारी पार पाडली.सर्व विजेत्यांना १५ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता राईस मिलर्स असोच्या सभागृहात जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन जि.प. अध्यक्षा सिमाताई मडावी, राज्यसभा सदस्य प्रफुलभाई पटेल, खासदार मधुकर कुकडे, खा. अशोक नेते, माजी खासदार नाना पटोले, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार गोपालदास अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम, माजी आमदार राजेंद्र जैन, गोंदिया नगराध्यक्ष अशोकराव इंगळे, उपाध्यक्ष शिव शर्मा, माजी जि.प. उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी श्रमती कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदचे मुख्यअधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा पोलीस अधिक्षक हरिष बैजल, जि.प. उपाध्यक्ष हमीद उल्ताफ अकबर अली, सभापती रमेश अंबुले, सौ. लता दोनोडे, सौ. सैलजा सोनवाने, विश्वजीत डोंगरे, माजी जिल्हा अध्यक्ष भाजपा विनोद अग्रवाल, जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते, राईस मिलर्स असोचे अध्यक्ष अशोक अग्रवाल व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. एच.एच. पारधी उपस्थित राहणार आहेत.