सिमावर्ती प्रश्नाबाबत लवकरच खा.चव्हाण यांना आराखडा सादर करणार

0
17
बिलोली (सय्यद रियाज ),दि.14_-तेलंगणा राज्याच्या सिमेलगत असलेल्या बिलोली तालुक्यातील सिमावर्ती भागातील विकास कामांपासून वचिंत असलेल्या गावांचा आराखडा तयार करण्याच्या सुचना खा.अशोकराव चव्हाण यांनी माजी आमदार आंतापुरकर यांना दिल्या होत्या.खा.चव्हाण यांच्या आदेशानुसार अंतापुरकर यांनी गत दहा दिवसांपासून सिमावर्ती भागातील प्रत्येक गावास भेट देऊन आराखडा तयार केला असून हा आराखडा लवकरच खा.अशोकराव चव्हाण यांच्याकडे सोपविणार असल्याची माहिती अंतापुरकर यांनी दिली.
दोन राज्याच्या सिमेवर असलेल्या बिलोली तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सिमेलगत असलेल्या गावांचा परिपुर्ण विकास झालेला नाही.याबाबत प्रश्न सिमावर्ती भागाचे या विषयी प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर,राजू पा.शिंदे,गंगाधर प्रचंड,व्यंकटराव सिदनोड,राजु पाटील कार्लेकर आदी समन्वयकांच्या पुढाकारातुन गत अडिच महिन्यापासून सगरोळी,कुंडलवाडी,बिलोली,आदी ठिकाणी सिमावर्ती भागातील लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या बैठका घेण्यात आल्या.व जिल्हाधिकारी अरूण डोंगरे,माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासह लोक प्रतिनिधी यांची भेट घेऊन सिमावर्ती भागातील लोकांच्या अडचणीचे निवेदन देण्यात आले.धर्माबाद येथे खा.अशोकराव चव्हाण यांच्याशी झालेल्या चर्चे नंतर सिमावर्ती भागातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन खा.चव्हाण यांनी या भागाचे माजी आमदार रावसाहेब अंतापुरकर, जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील,संजय बेळगे,काँग्रेस तालुका अध्यक्ष पाचपिंपळीकर ,पंचायत समिती सदस्य आदींना या विषयाच्या समन्वयकांसह सिमावर्ती भागातील जनतेच्या अडचणी जानूनघेऊन आराखडा तयार करण्याच्या सुचना दिल्या होत्या.खा.चव्हाण यांच्या आदेशानुसार मा.आ रावसाहेब अंतापुरकर व त्यांच्या सहकार्यांनी गत आठ दहा दिवसापासून सिमावर्ती भागातील २० ते २५ गावांना प्रत्यक्ष भेट देऊन त्या त्या गावातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.सिमावर्ती भागातील नागरिकांच्या समस्यांबाबत एक विकास आराखडा तयार करून हा आराखडा लवकरच खासदार अशोकराव चव्हाण यांच्याकडे सादर करून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती माजी आमदार रावसाहेब अंतापुरकर यांनी दि.१२ आँगस्ट रोजी सगरोळी येथील माणिकप्रभू मठात सिमावर्ती प्रश्ना बाबत आयोजित बैठकीत दिली.यावेळी सुनिल देशमुख,रोहित देशमुख,या भागातील काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते संजय भोसले,चंद्रकांत लोखंडे,गंगाधर शक्करवार,गंगाधर कुरूडगे,आनंदराव पायरे,दत्ता कोटनोड,प्रकाश जोशी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.