मुख्य बातम्या:

जुनी पेन्शन हक्क संघटन बनतय डीसीपीएस धारक कुटुंबीयांचा आधार

सांगली,दि.14_-1 नोव्हेंबर 2005 पासून शासकीय सेवेत आलेल्या सर्वच कर्मचाऱ्याना शासनाने अंशदान पेन्शन योजना लागू केली.ही नवी पेन्शन योजना फसवी आहे.या योजनेत असणाऱ्या कर्मचाऱ्याचे निधन झाले तर त्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेन्शन व इतर लाभ मिळत नाहीत.त्यामुळे अनेक डिसीपीएस धारक मृत कर्मचाऱ्याची कुटुंबे उघड्यावर पडली आहेत.त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.शासनाने अशा दुर्दैवी कर्मचाऱ्याची जबाबदारी झटकली असली तरी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होतेच,पण संघटनच्या माध्यमातून राज्यभरातील डिसीपीएस धारक व संवेदनशील कर्मचारी यांना या कुटुंबियांना मदत करण्याचे समाज माध्यमातून आवाहन करते.नुकतेच सांगली जिल्ह्यातील संख येथील गुरुबसव विद्यालयातील शिक्षक बी.टी. बिरादार सर यांचे आकस्मिक निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी चेतना,लहान मुले समृद्धी व शिवप्रसाद,वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगलीने बिरादार कुटुंबियांना मदत करण्याचे आवाहन केले.त्यास राज्यभरातून प्रतिसाद मिळाला त्यात संघटनने भर घालत 1 लाख रकमेचे दामदुप्पट योजनेत गुंतवणूक केलेल्या रकमेची ठेव पावती कै.बसवराज बिरादार सर यांचा लहान मुलगा शिवप्रसाद,मुलगी समृद्धी व कुटुंबीयांकडे जुनी पेन्शन हक्क संघटनचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे,जिल्हा सरचिटणीस राहुल कोळी,जिल्हा कार्याध्यक्ष विरेश हिरेमठ,जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार भोसले सर,माजी प. स.सभापती श्री. आर. के. पाटील सर यांनी सुपूर्द केली.

यावेळी जत तालुक्यातील पेन्शन हक्क संघटनचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.अंशदान पेन्शन योजनेमुळे युवा कर्मचाऱ्याचे भविष्य असुरक्षित बनले आहे.घरातील कमावत्या व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबांची होरपळ होत असून ही फसवी योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करेपर्यंत पेन्शन हक्क संघटनचा लढा चालूच राहील.राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कठीण प्रसंगात पेन्शन हक्क संघटन सदैव सोबत असेल.आपणच आपला आधार बनुया असे आवाहन जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केले.मा.आर.के पाटील सर यांनी कै. बिरादार सर यांच्या आठवणी व संघटनच्या कार्याचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सुञसंचलन कराडे सर यांनी केले तर जत तालुका अध्यक्ष श्याम राठोड सर यांनी भावनिक होत कार्यक्रमाचे आभार मानले .या प्रसंगी रमेश मगदूम,मिलन नागणे,राजकुमार भोसले,विरेश हिरेमठ,बालाजी पडलवार,गुरुबसू वाघोली, तानाजी कांबळे, ज्ञानेश्वर पांपटवार,शिवाजी आवताडे,रविंद्र सतारी,राजकुमार करडी, शरद कारंडे,राजेश देबाजे ,शिवाजी वडते,,अत्तार सर,गौरीश नवराज,एल. एस. जंगम, सायंसिंग पाडवी ,विकास पाडवी, किशोर चलाख ,पिल्ली श्रीकांत ,अभिजित माळगोंडे ,साळवे सर,आठवले ,दिलीप वाघमारे,राजकुमार करडी,कोट्याळ सर,अमगोंड हूबनूर ,एम जि बिरादार, मल्लिकार्जुन बालगांव ,के.एस रोडगे,काशिनाथ हिटनळ्ळी,कुमार चौगुले,महादेव भोसले, किरण पाटील, संतोष राठोड, मेंढेकर सर,श्री गूरुबसव विद्यामंदिर चे शिक्षक उपस्थित होते.

Share