आबांच्या पत्नीला बिनविरोध निवडून द्या, काँग्रेसच्या प्रतीक पाटलांची सर्व पक्षांना विनंती

0
7

सांगली : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून आबांच्या पत्नीला उमेदवारी देण्याची मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी केली आहे.

आबांच्या पत्नीला तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून उमेदवारी मिळावी. शिवाय
त्यांच्याविरोधात कोणत्याही पक्षाने उमेदवार उभा करु नये आणि निवडणूक बिनविरोध करावी, अशा विनंती प्रतीक पाटील यांनी सर्व पक्षांना केली आहे.

आबा त्यांच्या राजकीय कारकीर्दीत 1990 पासून सलग 6 वेळा तासगाव-कवठेमहांकाळमधून
विधानसभेवर निवडून गेले. तासगाव-कवठेमहांकाळ म्हणजे आबा, असे समीकरणच तयार झाले होते.

त्यामुळे प्रतीक पाटील यांच्या विनंतीला सर्व पक्षांचे नेते मान देतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.