मुख्य बातम्या:
काँग्रेस नेते पटोलेंच्या नेतृत्वात धडकला जनआक्रोश मोर्चा# #लाखाची लाच घेतांना उपअभियंता जाळ्यात# #ओबीसीच्या मुद्द्यावर भाजप लोकप्रतिनिधींचे पितळ उघडे पडले-आ.विजय वडेट्टीवार# #वेतन कपात प्रश्नी, सीईओची मुख्य सचिवाकडे तक्रार करणार# #पालकमंत्री संजय राठोड यांचा आज वाशिम जिल्हा दौरा# #स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार राज्यभर आंदोलन# #कुष्ठरुग्ण शोध अभियान यशस्वीतेसाठी जनतेनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे# #युवकावर चाकुने वार केल्या प्रकरणी युवतीवर नागभीड पोलीसांनी केला गुन्हा दाखल# #ओबीसी गैरआदिवासीच्या अन्यायाविरोधात ओबीसी युवा महासंघाने केली निर्णयाची होळी# #आलापल्ली-भामरागड मार्गावर आढळले नक्षली बॅनर

पंचायत समिती कार्यालयावरीव तिरंग्याजवळच आत्मदहनाचा प्रयत्न

अकोला,दि.15 : तेल्हारा तालुक्यातील ग्रामपंचायत वाकोडी तुदगाव येथे रितसर ग्राम विद्युत व्यवस्थापक पदासाठी अर्ज करुन एक वर्ष झाले. मात्र, अद्यापही जागा भरण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन ठराव न घेता टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करत एका युवकाने तेल्हारा पंचायत समितीच्या इमारतीवर स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण सुरू असताना आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या तरुणाने चक्क पंचायत समिती कार्यालयावर चढून अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला.अरूण देवमण चव्हाण, असे या युवकाचे नाव अाहे.सरपंच आणि सचिव याबाबतचा ठराव घेण्यास टाळाटाळ करीत होते. या सर्व प्रकारात हेळसांड होत असल्याने अरुण चव्हाण याने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र, याप्रकरणी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. अखेर न्याय मिळावा म्हणून 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी पंचायत समितीतीतील झेंडा वंदनवेळी अरुण देवमण चव्हाण यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सतर्कता दाखवून त्याला ताब्यात घेतले.  पुढील कार्यवाही तेल्हारा पोलीस करित आहेत.

 

 

Ad
Share