राज्यातील ५१ पोलीस अधिकारी, अंमलदारांना पोलीस पदके जाहीर

0
18

मुंबई,दि.16 : राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कार्यरत असताना शौर्यपूर्ण व उल्लेखनीय सेवा बजाविल्याबाबत राज्य पोलीस दलातील ५१ अधिकारी व अंमलदारांना शौर्य, राष्ट्रपती व पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह विभागाकडून विजेत्यांची घोषणा करण्यात आली. शौर्यपूर्ण कामाबद्दल या वर्षी तीन उपनिरीक्षकांसह आठ जणांना शौर्यपदक, उल्लेखनीय सेवेसाठी पुण्याचे सहआयुक्त शिवाजी बोडखे यांच्यास तिघांना राष्टÑपती पोलीस पदक तर गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल ४० जणांना पोलीस पदक घोषित झाले.मुंबईतील परिमंडळ-१०चे उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी, नाशिक एसीबीचे अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्यासह ४० जणांचा पोलीस पदक विजेत्यांमध्ये समावेश आहे.शौर्यपदक मिळालेले सर्व जण गडचिरोली येथे नियुक्तीला आहेत.

पोलीस शौर्यपदक
उपनिरीक्षक शीतलकुमार डोईजड, हर्षद काळे व ृ अजितकुमार पाटील, पोलीस नाईक प्रभाकर मडावी व महेश जाकेवार,टिकाराम काटेंगे, कॉन्स्टेबल राजेंद्र ताडामी व सोमनाथ पवार. राष्टÑपती पदक पुण्याचे सहआयुक्त शिवाजी बोडखे निरीक्षक दयानंद ढोमे (पुणे) व साहाय्यक फौजदार बाळू भवर (नाशिक शहर)

पदक विजेत्यांची सविस्तर नावे (कंसात नियुक्तीचे ठिकाण)

पोलीस पदक : उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी (परिमंडळ-१०, मुंबई), अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले (एसीबी, नाशिक), समादेशक श्रीकांत पाठक (रा.रा.पो. बल गट ७, दौंड), उपायुक्त सारंग आवाड (पुणे महानगर विकास प्राधिकरण, पुणे), सहायक समादेशक रवींद्र महापदी (रा.रा.पो. बल गट ११, नवी मुंबई), साहाय्यक आयुक्त शिरीष सावंत (मुंबई), उपअधीक्षक सुदर्शन मुंढे (अहमदनगर) व धुळा टेळे (मुंबई), निरीक्षक विठ्ठल मोहिते (मोटार परिवहन विभाग, पुणे), सतीश मयेकर (मुंबई), गौतम गायकवाड (एसआरपीएफ, नानवीज, दौंड), प्रिनाम परब, योगेंद्र पाचे, अजय सावंत (सर्व मुंबई), गणपत पिंगळे (ठाणे शहर), राजेंद्रसिंग गौर (जालना), अनंत कुलकर्णी (औरंगाबाद ग्रामीण), विठ्ठल कुबडे (पुणे शहर), उपनिरीक्षक दिगंबर जाखडे (पुणे शहर) व किशोर अत्रे (बिनतारी विभाग, पुणे), साहाय्यक फौजदार दत्तात्रय मासाळ (कोल्हापूर), रवींद्र सपकाळे (जळगाव), अरुण अहिरे (नाशिक शहर), कृष्णाजी सावंत (मुंबई), आरीफखान पठाण, सुभाष जाधव (दोघे नाशिक शहर), जलील शेख (नागरी हक्क संरक्षण, अहमदनगर), हवालदार चंद्रकांत इंगळे, (पुणे शहर), सय्यद अफसर जहूर, (परभणी), सिद्धराय सत्तेगिरी (मुंबई), हवालदार नेताजी देसाई (एसीबी, मुंबई), प्रभू बेलकर, संतोष दरेकर, अविनाश लिंगवले, पांडुरंग शिंदे, रमेश सुर्वे (सर्व मुंबई), रमाकांत बावीस्कर (नागरी हक्क संरक्षण, नागपूर), वसंत पन्हाळकर (कोल्हापूर), नंदकुमार मिसर (गुप्तवार्ता अधिकारी, राज्य गुप्तवार्ता विभाग, नाशिक), चिमाजी बाबर (पोलीस प्रशिक्षण केंद्र, लातूर)