उमरझरी वनक्षेत्रात निकृष्ठ बांधकाम

0
8

भंडारा,दि.16ः- नागझिरा व्याघ्र प्रकल्पात येणार्‍या उमरझरी वनक्षेत्रात (वन्यजिव) अभयारण्य क्षेत्राबाहेर असलेल्या जंगलात विविध कामे करून अधिकार्‍यांनी कंत्राटदारांसोबत मिळून मोठा भ्रष्टाचार केल्याचे समोर आले आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नविन नागझिरा वन्यजीव अभयारण्यातील उमरझरी वन परिक्षेत्रात अधिकार्‍यांनी कार्यक्षेत्रात व अधिकार क्षेत्रात येत नसलेल्या सर्रा ते लोणारा या रस्त्यावर बसविण्यात आलेले व चांगल्या स्थितीत असलेले जुणेच ह्युम पाईप नवीन बसविल्याचे दाखविले. याठिकाणी साधारणत: अडीच लाख रुपयांचे १३ ते १४ ह्युम पाईप बसविण्याचे काम या रस्त्यावर करण्यात आले. हे निकृष्ट दर्जाचे झाल्याने एकाच पावसात खराब झालेले आहेत. काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे रस्ता खराब झालेला आहे. या भागात नांदलपार व कोडेलोहारा येथील नागरीकांची शेती असल्याने वहीवाटीचा या जुना मार्गावरून त्यांना शेतात बैलगाडी, ट्रॅक्टर नेण्याकरीता अडचण निर्माण झालेली आहे.
अधिकार्‍यांनी अभयारण्य घोषीत होण्यापुर्वीच जुनीच प्रस्तावित असलेली व काही झालेली कामे नवीन दाखवून शासकीय निधीची विल्हेवाट लावली.
त्यामुळे शेतकर्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच रस्त्यावर रस्ता दुरूस्तीची कामे दाखवून नियमबाह्य पद्धतीने दाखवून कंत्राटदारासोबत शासकीय रक्कमेची उचल करून भ्रष्टाचार केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.