अटल बिहारी वाजपेयींच्या प्रकृतीत सुधारणा नाहीच, मोदी अन् अमित शहा पुन्हा रुग्णालयात

0
12

नवी दिल्ली,दि.16(वृ्त्तसंस्था)- भाजपाचे नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी  यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.बाजपेयी यांच्यावर 11 जून 2018 पासून एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या 93 वर्षांच्या वाजपेयींची प्रकृती नाजूक आहे. गेल्या 24 तासांमध्ये त्यांची प्रकृती अधिकच खाल्यावल्याचे एम्सकडून सांगण्यात आले आहेपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना पाहण्यासाठी एम्समध्ये जाऊन आले. त्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे, सुरेश प्रभू, हर्षवर्धन, जितेंद्र सिंह, शाहनवाज हुसैन हेसुद्धा वाजपेयींना पाहण्यासाठी एम्समध्ये गेले होते.