२ सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘आप’चे आंदोलन

0
9

गोंदिया,दि.18ः-येथील शासकीय रुग्णालयातील अव्यवस्थेला घेऊन आम आदमी पार्टीचे मागील एक वर्षापासून आंदोलन सुरू आहे. मात्र मागण्या मान्य झाल्या नाही. संपूर्ण महाराष्ट्रातच ही अवस्था असून शासनाला काही देणे घेणे नाही. अश्या सत्ताधार्‍यांना धडा शिकविण्यासाठी व जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता आम आदमी पार्टी २ सप्टेंबरपासून आंदोलन करणार असल्याची माहिती आप पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माजी खा. ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी दिली.
ते १६ ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी पुरूषोत्तम मोदी, उमेश दमाहे, अतुल गुप्ता, सायमा खान, डॉ. नितेश बाजपेई, अशोक सक्सेना, रविंद्र पटले, विनायक राखडे, कैलाश नंदेश्‍वर उपस्थित होते.पुढे ते म्हणाले की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदियात आयोजित विविध कार्यक्रमात ते आले असून आपच्या रूग्णालयातील मागण्या संदर्भातील धरणे आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र सत्ताधारी सुविधा पुरविण्यात अपयशी ठरले आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या करतोय, शिक्षणाच्या व इतर अनेक समस्या आहेत. तर दिल्लीत मागील तीन वर्षात सरकारी शाळांची स्थीती बदलली, वीस हजार लिटर पाणी मोफत देत आहोत, आरोग्य व औषध मोफत, विजेचे दर देशात सर्वात स्वस्त असून सामान्य माणसाला आधार देण्याचे काम आम आदमी पार्टीने केले आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी व बीजेपीचा समूळ उच्चाटन करायचा आहे व एक समृध्द व आनंदी महाराष्ट्र निर्माण करणार असल्याचे आमचे ध्येय आहे. पुढील लोकसभा व विधानसभेच्या सर्व जागा आम्ही लढणार आहोत. पुढची भंडारा गोंदिया लोकसभेची जागा कार्यकर्ते उमेश दमाहे लढणार असल्याचे आम्ही निश्‍चित केले असून सदर माहिती वरिष्ठांना कडविणार असल्याचे हि ते म्हणाले.