रानमांजराची शिकार करणार्‍या तिघांना अटक

0
14

गडचिरोली ,दि.18ः-रानमांजराची शिकार करून विक्रीसाठी नेणार्‍या तिन शिकार्‍यांना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास वनविभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. पितांबर रू षी सुरपाम, दिवाकर पत्रू मेर्शाम, सोमेश्‍वर दामोदर कांबळे, दामोदर देवाजी शेरकी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे रानमांजराची शिकार ही जिल्ह्यातील पहिलीची घटना आहे.
प्राप्त माहितीनुसार काल वनपरिक्षेत्र अधिकारी कैलुके, वन्यजीव रक्षक मिलींद उमरे हे पुलखल, मुडझा परिसरात वन्यजीव विषयक पाहणी करीत असताना मुडझा येथे काही इसम बांबुचे वास्ते विकताना आढळून आले. वनपरिक्षेत्र अधिकारी व इतरांनी सदर इसमांकडे धाव घेतली मात्र ते स्वत:कडे वास्ते तिथेच टाकून पळून गेले. बांबुचे वास्ते ताब्यात घेऊन पाहणी केली असता एका प्लॉस्टिमध्ये प्राण्याचा मृतदेह आढळून आला. तो बाहेर काढून पाहणी केली असता सदर मृतदेह रानमांजर असल्याचे आढळून आले. घटनास्थळी दोन इसम जवळच आढळून आले. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारणा केली असता ते ग्राहक असल्याचे सांगितले. आरोपैकी एकाला ओळखत असल्याचेही सदर इसमांनी सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी कैलुके यांनी सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या मार्गदर्शनात तपासाची चक्र वेगाने फिरवून पितांबर सुरपाम, दिवाकर मेर्शाम, सोमेश्‍वर कांबळे, दामोदर शेरकी या तीन आरोपींना अटक केली.
सदर कारवाई मुख्य वनसंरक्षक डब्ल्यूत्र आय. यटबॉन, उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या नेतृत्वात क्षेत्रसहायक जेणेकर,काळे, कवडे, बोढे, भसारकर, चव्हाण, राठोड, ठाकरे, दीकोंडावार, मट्टामी, कोडापे, खोब्रागडे व कर्मचार्‍यांनी केली.